शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेनिमित्त पंढरीत दररोज येतात ५५ हजार वाहने

By admin | Updated: July 1, 2017 12:18 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर : सचिन कांबळेपंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त श्री पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून रोज सुमारे ५५ हजार वाहने दाखल होतात. शहरातील विविध आठ ठिकाणी नि:शुल्क वाहन पार्किंगची सोय वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आली आहे.पंढरपुरात भरणाऱ्या चार यात्रांपैकी आषाढी यात्रेचा सोहळा मोठा असतो. यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाविकांची गर्दी असते. आषाढी यात्रेच्या कालावधीत चारचाकी वाहने, जडवाहतूक शहरातून बंद करण्यात येते. तसेच प्रदक्षिणा मार्ग, व्ही.आय.पी. रोड, स्टेशन रोड येथे सर्व वाहनांना प्रवेश बंद केला जातो. मात्र अत्यावश्यक सोयी पुरविणाऱ्या, वारकऱ्यांचे अन्न असलेले वाहन, पाण्याच्या टॅँकरला व वैद्यकीय अधिकारी यांना पोलीस वाहतूक शाखेकडून परवाना देण्यात आला आहे. गर्दीत अपघात होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बसस्थानकदेखील गर्दीच्या ठिकाणापासून शहराबाहेर नेले आहे़ तसेच शहरात नवीन सोलापूर नाका, सरगम चौक, सहकार चौक, सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस व नवीन सोलापूर नाका अशी एकेरी वाहतूक करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे अधिकारी नीलेश गोपाळचावडीकर व सपोनि सारंग चव्हाण यांनी दिली.-------------------या ठिकाणी पार्किंगची सोयपंढरपूर शहरात अंबाबाई पटांगण, मोहोळ रोड विसावा, इसबावी विसावा, कंडरे जिम, वेअरहाऊस, लक्ष्मी टाकळी आण्णाभाऊ विद्यालय, यमाई-तुकाई तलाव परिसर, बिडारी बंगला अशा ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे़-------------------तीन बसस्थानके शहरात एस. टी. येऊन वाहतूक ठप्प होऊ नये. कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागातील एस. टी. बससाठी चंद्रभागा बसस्थानक, मराठवाडा व सोलापूर विभागातील एस. टी. बससाठी मोहोळ रोडवर भीमा बसस्थानक व उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भातील एस. टी. बससाठी गुरसाळे येथे विठ्ठल बसस्थानक तयार करण्यात आले आहे.--------------------------अशी आहे अधिकाऱ्यांची संख्यासहाय्यक पोलीस आयुक्त - २पोलीस अधिकारी - २२वाहतुक पोलीस अधिकारी - ३७०पॉइंट - १००