शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

थेंबे थेंबे तळे साचत' नीरा खोऱ्यातील धरणांनी पाणीसाठा ओलांडला पंचाहत्तरी

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 1, 2023 18:39 IST

सिंचनाचा प्रश्न मिटला : नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे

सोलापूर : पुरंदर, भोर, वेल्ह्याच्या धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नीरा खोऱ्यातील धरणं हळूहळू पूर्ण क्षमतेने भरण्याची वाटचाल सुरू झाली आहे. 'थेंबे थेंबे तळे साचे' म्हणीप्रमाणे मंगळवारी नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणांनी सरासरी पंचाहत्तर टक्के ओलांडली.

धरणाच्या कालव्यावर अवलंबून असणा-या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीप्रश्न सुटला आहे. पंधरवड्यापासून  या चार धरणांच्या पातळीत वाढ होत आहे.२० जुलै २०२२ ला चारही धरणांचा पाणीसाठा ४० टक्के म्हणजे १९ द.ल.घ.मी. होता. त्यानंतर २५ जुलैला तो ६० टक्के म्हणजे २९ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होता. मंगळवारी सकाळी ७६.३६ टक्के म्हणजे ३६.८९७ द.ल.घ.मी. झाला. असाच पाऊस राहिला तर १० ऑगस्टपर्यंत चारही धरणांची पातळी १०० टक्के होईल.

३१ जुलै २०२२ पर्यंत नीरेच्या वीर धरणातून दोनवेळा विसर्ग केला होता. यावर्षी मात्र अजून दहा ते पंधरा दिवस नदीत विसर्ग होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. गतवर्षी ३१ जुलै २०२२ रोजी चारही धरणांतील पाणीसाठा ३७.६६७ द.ल.घ.मी. ७७.९४ टक्के होता. १ आगस्ट २०२३ रोजी ३६,८९७ द.ल.घ.मी. ७६:३६ टक्के आहे.

हवामान विभागाकडून पुढील आठ दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आहे. आता धरणातून पाण्याचा विसर्ग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या शेतक-यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे लागले आहेत.बंधाऱ्याची दर्पे काढली..

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नीरा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दर्पे लावलेली होती. त्यामुळे नदी पात्रात मुबलक पाणी होते. आता सर्व दर्पे काढली आहेत.१ ऑगस्ट २०२३ सकाळची टक्केवारी

भाटघर : ७८.३५ टक्के, निरा देवघर : ८६.९४ टक्के, वीर : ८०.५६ टक्के, गुंजवणी : ७०.०५ टक्के गतवर्षी १ ऑगस्ट २०२२ रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा ३७.६७९ टीएमसी व टक्केवारी ७७.९६ एवढा होता. आज १ ऑगस्ट २०२३ रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८७९ टीएमसी व ७६.६३ टक्के एवढा आहे.