शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हरणांच्या सुरक्षेसाठी हायवेवर दहा फूट जाळीचे आवरण; धरणे आंदोलनानंतर घेतली दखल

By विलास जळकोटकर | Updated: March 24, 2023 15:57 IST

एक काळविटावर पुण्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचे सोलापूर व राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.

सोलापूर - विजयपूर महामार्गावर दोन महिन्यापूर्वी १२ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतरही दखल घेतली नसल्याने धरणे आंदोलन छेडताच हायवेवर पुलाच्या दोन्ही बाजूस दोन फूट कठडा आणि आठ फूट आवरण असलेली जाळी बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

सोलापूर - विजयपूर महामार्गावर पूणेरोड केगाव ते हत्तूर बायपास चार पदरी रिंगरोड तयार करण्यात आला आहे. या महामार्गावर केगाव येथील देशमुख वस्तीजवळ अंडरपासवर २८ जानेवारी रोजी संध्याकाळी १५ काळवीट पुलावरून खाली पडून १२ काळविटांचा जागीच मृत्यू तर दोन काळविटांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. एक काळविटावर पुण्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचे सोलापूर व राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. सोलापुरातील विविध पर्यावरण संस्थांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता. तर नागरिकांनी चौकाचौकात श्रद्धांजली सभा घेतल्या होत्या. घटनेची चौकशी करुन कारवाई करन्यासाठी जीआयबी फाउंडेशन आणि डब्लूसीएएस या संस्थाकडून जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन देण्यात आले होते. धरणे आंदोलनानंतर दखल

घटनेची चौकशी करुन तातडीने केद्रसरकारच्या वने व हवामानबदल विभागास अहवाल सादर करणे करीता अप्पर प्रधान वन्यजीवरक्षक पश्चिम विभाग मुंबईचे श्री बेन यांनी घटना स्थळी भेट दिली होती. या घटनेनंतर दोन महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचे ठोस कारवाई किंवा उपाययोजना झाली नसल्याने  १५ मार्च २०२३ रोजी जे आयबी फाउंडेशनच्या वतीने उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग प्रादेशीक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात डब्लू सी ए एस, वाईल्डलाईफ केअर संस्थेच्या सदस्स्यांनी भाग घेतला होता.

या आंदोलनाची दखल घेऊन चारच दिवसात धरणे आंदोलनात मागणी केलेल्या हरणांच्या मृत्यू घडलेल्या ठिकाणी पुलावर जाळीचे आवरण उभारण्याचे काम एन एच ए आय च्या वतीने आयबीएम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरु झाले. 

पुलाच्या दोन्ही बाजूने दहा फूट आवरण

दोन फूट उंचीचा कठडा आणि आठ फूट जाळीचे असे एकूणदहा फूट आवरण पूलाच्या दोन्ही बाजूने उभारण्यात येत आहे. या काममाची सुरूवात आज  वनपरीक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षीअभयारण्य नान्नज याच्या हस्ते करण्यात आले. हे काम येत्या २५ ते ३० दिवसात पुर्ण करण्याची योजना आहे.