शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

पंढरपूर तालुक्यावर सलग तिसऱ्या वर्षी महापुराची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

यावर्षी तरी पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. ...

यावर्षी तरी पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने वेळेवर हजेरी लावली. जूनमध्ये काहीशी संथगतीने वाटचाल केलेल्या पावसाने मागील आठवड्यात झोप उडवून दिली. त्यामुळे मायनसमध्ये आलेले धरण रातोरात प्लसमध्ये आले होते. अवघ्या ५ दिवसांत उजनी धरणात तब्बल ४० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर पाण्याचा वेग मंदावला असला तरी धरण ५० टक्क्यांवर आले आहे. तर पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे वेगाने भरत आहेत.

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांत जवळपास १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पुुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांतून उजनीमध्ये हळूहळू पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे.

पावसाळा आणखी किमान दोन महिने बाकी आहे. वरील सर्व धरणे भरल्याने उजनी धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरू शकते, अशी परिस्थिती आहे.

नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो असल्याने त्यामधून कमी-जास्त करून विसर्ग सोडणे सुरू आहे. येत्या काही दिवसात उजनी धरणातूनही भीमा नदीत पाणी सोडण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. नीरा व भीमा नरसिंहपूर येथील संगमावरून पुढे एकत्रित वाहत असल्याने भीमा दुथडी भरून वाहते. त्यामुळे नदीकाठच्या गावावर सलग तिसऱ्या वर्षी महापुराचे सावट गडद होत आहेत.

मात्र गेल्या दोन वर्षांचा धरण व्यवस्थापनाचा अनुभव पाहता पूरस्थिती टाळण्यासाठी पक्क्या नियोजनाची गरज आहे.

मागील वर्षी व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले

२०१९ आणि २०२० या दोन्ही साली भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी भीमेच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांचे, शेतकऱ्यांचे व पंढरपूर शहरातील नागरिकांचे शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे आणि त्या नुकसानीला, पूरस्थितीला केवळ धरण व्यवस्थापन जबाबदार होते. उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग मोठा असताना, धरण १०७ टक्के भरलेले असतानाही उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन केले नव्हते. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी धरणातील फुगवट्याचे पाणी येऊन वाहतूक बंद पडली होती. आणि रात्रीत उजनीतून २ लाख २५ हजार क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग सोडल्याने भीमा नदीकाठच्या लोकांना हातचे सोडून सुरक्षित ठिकाणी पळ काढावा लागला होता. यावर्षी तरी पूरनियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

कालव्याद्वारे पाणी सोडून तळी, तलाव भरून घ्यावेत

यावर्षी धरणे लवकर भरल्याने पूरस्थितीचा धोका मागील दोन वर्षाप्रमाणे अधिक आहे. मागील दोन वर्षीच्या अनुभवातून धरण व्यवस्थापनाने धडे घेऊन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूरस्थिती आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी आतापासूनच लक्ष घालण्याची गरज आहे. धरणाची पातळी जवळपास ७० टक्के झाल्यानंतर त्यामध्ये अधिकचे पाणी न अडविता वरून येणारा विसर्ग लक्षात घेऊन धरणातून दोन्ही कालव्यांद्वारे पाणी सोडून त्या माध्यमातून तळी, तलाव भरून घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने उजनीतील पाणी साठ्यावरही काही प्रमाणात नियंत्रण राखता येणार आहे.

कोट ::::::::::::::::::

मागील दोन वर्षे नदीला आलेल्या पुराचा अनुभव लक्षात घेता यावर्षी धरणातून पाणी सोडून वरून येणारा विसर्ग साठविण्याएवढी जागा शिल्लक ठेवणे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी साठवून ठेवता येईल. धरणात येणारा पाण्याचा प्रवाह आणि धरणातून सोडला जाणारा पाण्याचा प्रवाह यावर सतत लक्ष ठेवून पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. यासाठी आम्ही पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून आहोत. भविष्यातही योग्य नियोजन करू. पूरपरिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक ते आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- सचिन ढोले

प्रांताधिकारी, पंढरपूर

फोटो ::::::::::::::::

नीरा खोरे, व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी अशी भरून वाहत आहे. (छायाचित्र : मोहन डावरे)