शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यातील शौचालय घोटाळ्यातील अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित करा ! सदाभाऊ खोत यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 16:51 IST

मोहन गायकवाड यांनी कुर्डू येथील शौचालय घोटाळ्यासंदर्भात हे आंदोलन सुरू केले होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांना दुरध्वनीवरून संबधित ग्रामसेवक, व उपअभियंता यांना निलंबित करून अहवाल पाठविण्याचे तोंडी आदेश दिले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरलऊळ दि २४ :  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने पंचायत समिती माढा समोरील दि १४ अॉगष्टपासुन सुरू असलेले कुर्डुतील शौचालयातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी करण्यात आलेले ठिय्या व घंटानाद आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचा ७२ वा दिवस होता. मोहन गायकवाड यांनी कुर्डू येथील शौचालय घोटाळ्यासंदर्भात हे आंदोलन सुरू केले होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांना दुरध्वनीवरून संबधित ग्रामसेवक, व उपअभियंता यांना निलंबित करून अहवाल पाठविण्याचे तोंडी आदेश दिले़कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी वरवडे येथे जाण्यासाठी आले असता कुर्डूवाडी येथे आले़ त्यांनी उपोषणकर्त्या मोहन गायकवाड यांच्या उपोषणस्थळाला भेट दिली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांंना अनेक वेळा फोन लावूनही त्यांच्या फोनला प्रतिसाद मिळाला नाही़ त्यावेळी खोत यांनी सीईओंचे स्वीय सहाय्यक यांना फोन लावला असता मी रजेवर आहे असे उत्तर मिळाले. त्यानंतर पंचायत समिती अधिकाºयांकडे त्यांनी जिल्हा परिषदेचा  लँडलाईन नंबरही मागितला पण उपलब्ध झाला नाही. त्यावेळी ते संतापले.  तब्बल अर्धा तासात अनेकवेळा मोबाईलवरुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोन घेतला नाही. यानंतर त्यांनी संबधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन उपमुख्य अधिकारी लोंढे यांना संबधित आदेश दिले. कुर्डू येथील पाच शौचालयापैकी चार शौचालय गायब असून उर्वरित एक तेही नादुरूस्त असल्याने त्याची चौकशी व्हावी व घरकुल,गटारी यामध्येही घोटाळा झाला असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोहन गायकवाड  गेली ७२ दिवस ठिया आंदोलन करत होते. सदाभाऊ खोत यांनी ठिया आंदोलन करणा-या गायकवाड यांना पाणी देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले़ त्यामुळे आंदोलन संपले. आंदोलन संपल्यानंतर गायकवाड यांनी पंचायत समितीसमोर फटाक्याची आतिषबाजी केली़फोटो ओळ : माढा पंचायत समितीसमोर ७२ दिवसांपासुन सुरू असलेले कुर्डु येथील शौचालय घोटाळ्यासंदभातील मोहन गायकवाड यांचे ठिया आंदोलन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने संपले़