शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरत-चेन्नई, रिंगरूटच्या नुकसान भरपाई बाबत योग्य कार्यवाही करा!

By संताजी शिंदे | Updated: May 12, 2023 17:28 IST

तक्रारीची घेतली दखल: केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाचे नॅशनल हायवेला पत्र

सोलापूर : जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई व त्याला शहराच्या बाहेरून जाेडणाऱ्या रिंगरूटसाठी संपादीत होत असलेल्या जमीनीची नुकसान भरपाई बाबत, योग्य कार्यवाही करावी अशी सुचना देणारे पत्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने हे पत्र पाठवले आहे.

         केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग जात आहे. बार्शी, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तीन तालुक्यातील ३७ गावांमधून हा रस्ता जात आहे. यामध्ये बार्शी-१५, दक्षिण सोलापूर ४ आणि अक्कलकोट तालुक्यातील ३५ गावातून हा रस्ता जात आहे. सुमारे १५० किलोमीटर अंतरातून हा महामार्ग जात आहे. या रस्त्याला शहराच्या बाहेरून जोडण्यासाठी रिंगरूट (बाह्यवळण) तयार केले जात आहे. ६० कि.मी. चा बाह्यवळण उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातून जात आहे. दोन्ही मार्गाची मोजणी झाली आहे, सध्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू आहे. असे असताना रेडीरेककनुसार काढण्यात आलेला दर बाधीत शेतकऱ्यांना मान्य नाही.

          जमीनीला देण्यात येणारा मोबदला परवडणारा नाही, त्यामुळे तो योग्य व पाच पटीने देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे केली होती. निवेदनाची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून पत्र काढले आहे. पत्रात अर्जदारांने केलेल्या  मागण्यांच्या अनुषंगाने एलए, ॲक्टच्या मार्दर्शन तत्वानुसार योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास दिल्या आहेत.  आदेशावर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या वतीने योग्य कार्यवाही योजावी अशा सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसह नागिरांनी दिले होते निवेदन० रेडीरेककनुसार देण्यात आलेला दर हा अत्यंत कमी आहे. शेतकऱ्यांनी आम्हाला जमीनीचा योग्य मोबदला द्यावा. पाच पटीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. अंकुश चव्हाण (रा. खडकी, धाराशीव), अमोल वेदपाठक (रा. कालेगाव जि. सोलापूर), सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या नागपूर येथील कार्यालयातील तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी सोलापूरातील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे.