शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : ऊस दराचा तिढा कायम, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली 9 बैलगाड्या-3 ट्रॅक्टरची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:55 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि ४ : ऊस दरावर निर्णय झाला नसून तिढा कायम आहे. यामुळे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटला असून शुक्रवार व शनिवारी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणा-या नऊ बैलगाड्या व तीन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. अनेक ऊस वाहतूक वाहन चालकांना गुलाब ...

ठळक मुद्दे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटलापाऊस चांगला झाल्याने उसाची वाढऊस वाहतूक वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि ४ : ऊस दरावर निर्णय झाला नसून तिढा कायम आहे. यामुळे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटला असून शुक्रवार व शनिवारी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणा-या नऊ बैलगाड्या व तीन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. अनेक ऊस वाहतूक वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करीत ऊस वाहतूक करु नका, अशी विनवणी केली. 

शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे माढा तालुक्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहकारमंत्री व सचिवांच्या बैठकीत एफआरपीवर कारखानदार ठाम राहिल्यामुळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांना मान्य नसल्यामुळे बैठक फिस्कटली. 

आठवड्यापासून स्वाभिमानीचे कार्यकर्ते फिरुन भाव घोषित केल्याशिवाय ऊस उत्पादकांना ऊसतोड करु नका व वाहन चालकांना ऊस वाहतूक करु नका, अशी विनवणी हात जोडून करीत होते. सहकार मंत्र्यांच्या बैठकीनंतर आपण ऊसतोड करु, असे सांगत होते. मात्र बैठक फिस्कटूनही ऊस उत्पादकांनी ऊसतोड करुन आपली वाहने कारखान्याकडे पाठविण्याचा घाट घातला होता. त्याला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, तालुका कार्याध्यक्ष महावीर सावळे, प्रसिध्दीप्रमुख सत्यवान गायकवाड, दत्तात्रय पंडित, मुसा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाची वाढ अजून होत आहे. शेतक-यांनी उसाला तोडी घेऊ नये, कारखानदार एफआरपीवर ठाम आहेत. त्यांच्यात एकी दिसते. त्याप्रमाणे शेतकºयांनीही आपली एकजूट दखवावी. खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे उसाचा पहिला हप्ता ३४०० रुपये जोपर्यंत कारखानदार देत नाहीत तोपर्यंत ऊस वाहतूक करु देणार नाही. आजचे आंदोलन शांततेने व गांधीगिरीने केले आहे.-शिवाजी पाटील,  जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना