लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य गमावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या काळात येणारा एकांतपणा, व्यसन यामुळे मानसिक आजार वाढत आहेत. एखाद्याला नैराश्य आले असेल किंवा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला तर जवळच्या व्यक्तीसमोर मन मोकळे करा. त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर पर्याय असू शकत नाही.
- डॉ. संतोष बिनवडे,
मानसोपचार तज्ज्ञ, बार्शी