मोडनिंब : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ या हंगामात १५ जानेवारीपर्यंत झालेल्या ऊस गाळपावर प्रति मेट्रिक टन २ हजार रुपयांप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ या गळीत हंगामात आजअखेर पिंपळनेर (युनिट नं.१) येथे ११ लाख ६६ हजार ३६३ मे. टन उसाचे गाळप झाले. यातून ११ लाख ०१ हजार ५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले, तसेच करकंब (युनिट नं.२) येथे ३ लाख १४ हजार ८६८ मे. टन उसाचे गाळप झाले. ३ लाख २६ हजार ३०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. या हंगामामध्ये दोन्ही युनिटने १५ जानेवारीअखेर गाळप झालेल्या उसासाठी प्रति मेट्रिक टन २ हजारप्रमाणे पहिले ॲडव्हान्स ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने वेळेत ऊस बिल अदा करण्याची परंपरा कायम ठेवत ऊस बिलाचे पेमेंट ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे.