सोलापूर : जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये खादिमाने उर्दू फोरम यांच्या वतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व सर सय्यद अहमद खान यांच्या जीवनावर आधारित ऑनलाइन स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत मंद्रुप येथील उर्दू माध्यमिक विद्यालयातील नववीची विद्यार्थिनी जैनब सिकंदर नदाफ या विद्यार्थिनीने १०० पैकी १०० गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. चेअरमन सलीम शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका वाय. एस. खान यांनी जैनबचे कौतुक केले.
जैनब नदाफचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST