शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

धर्मराज रामपुरे यांची यशोगाथा; सेवानिवृत्तीनंतर ‘ते’ झाले शिल्पकलेचे शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:10 IST

सोलापूर : शिकण्याची जिद्द मनात असली तर कोणत्याही वयात शिकता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कलाशिक्षक धर्मराज रामपुरे. येथील ...

ठळक मुद्देशिकण्याची जिद्द मनात असली तर कोणत्याही वयात शिकता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कलाशिक्षक धर्मराज रामपुरेनॉर्थकोट तांत्रिक विद्यालयात विणकाम विभागात शिक्षक असलेले धर्मराज यांनी सेवानिवृत्तीनंतर साठाव्या वर्षी मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्टस्मध्ये प्रवेश घेतलाजे. जे. स्कूलमध्ये शिकविण्यासाठी त्यांना फेलोशिप मिळाली; सध्या ते तेथील विद्यार्थ्यांना शिल्पकला शिकवितात.

सोलापूर : शिकण्याची जिद्द मनात असली तर कोणत्याही वयात शिकता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कलाशिक्षक धर्मराज रामपुरे. येथील नॉर्थकोट तांत्रिक विद्यालयात विणकाम विभागात शिक्षक असलेले धर्मराज यांनी सेवानिवृत्तीनंतर साठाव्या वर्षी कलेची काशी समजल्या जाणाºया मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्टस्मध्ये प्रवेश घेतला. चार वर्षांचा शिल्पकला डिप्लोमा पूर्ण करून महाराष्ट्रात तिसरे आले. याच जे. जे. स्कूलमध्ये शिकविण्यासाठी त्यांना फेलोशिप मिळाली. सध्या ते तेथील विद्यार्थ्यांना शिल्पकला शिकवितात.

रोजगाराच्या निमित्ताने हे कुटुंब कर्नाटकातून सोलापुरात स्थायिक झाले. आजोबा कापड गिरणीत तर वडील देवेंद्र मिळेल ते काम करून गुजराण करीत असत. वडिलांना भजन, कीर्तनासोबत मूर्तिकलेची ओढ लागली, ती मूर्तिकार शिवाजी गाजूल यांच्यामुळे. लहानपणी धर्मराज आपल्या वडिलांसोबत देवदेवतांची आणि शोभेच्या लहान मूर्ती बनवून सोलापूरच्या रस्त्यावर बसून विकत असत.नॉर्थकोट प्रशालेतून शिक्षण घेत असताना पेंडसे सरांनी धर्मराज यांची चित्रकला पाहून जे. जे. स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सुचविले, पण गरिबी आड आली. पुढे पेंडसे सरांमुळेच नॉर्थकोटमध्ये विणकाम विभागात शिक्षकाची नोकरी मिळाली. जे. जे.मध्ये शिकण्याची आपली अर्धवट राहिलेली इच्छा लहान बंधू भगवान रामपुरे यांना जे.जे.मध्ये प्रवेश घेऊन १९८२ साली पूर्ण केली. पुढे जे.जे.मध्ये शिक्षणाची संधी मिळाली व संस्थेने फेलोशिप देऊन तिथेच शिकविण्यासाठी नेमणूक केली. साठीनंतर शिक्षण व नोकरीचा त्यांचा हा प्रवास आगळावेगळाच ठरला.चित्रे काढण्याचा प्रयत्न असा..घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आई नरसम्मा रेल्वे स्टेशनवर कोळसा उचलण्याचे काम करत असे. शिकत असतानाच यल्ला दासी, एस. एम. पंडित, राजा रवी वर्मा अशा मोठ्या चित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास करीत धर्मराज रामपुरे यांनी चित्रे काढण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Solapurसोलापूरartकलाcollegeमहाविद्यालय