शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बाजारांसाठी महानगरपालिकेने जागा द्याव्यात : सुभाष देशमुख , सोलापूरात दुसऱ्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

By admin | Updated: April 10, 2017 19:20 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रित निर्णय घेऊन प्रभागनिहाय शेतकरी आठवडा बाजारासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी, उत्पादक कंपन्यांच्या मदतीने सोलापूर शहरात शेतकरी आठवडा बाजार सुरु करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या हितासाठी महानगरपालिकेने विनामूल्य जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे मत सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. सोलापूर शहरातील दुसऱ्या आठवडा बाजाराचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत, महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते सोमवारी नवीन पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे, केशवनगर पोलीस वसाहत मैदानात झाले, यावेळी देशमुख बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी आठवडा बाजारासाठी जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला असून, शेतकरी, उत्पादक कंपन्यांना याकरिता शहरी भागात विनामूल्य जागा मिळतील. यापूर्वीही सोलापूर महानगरपालिकेकडे या बाजाराकरिता जागेची मागणी केलेली होती. जागेचे भाडे जास्त सांगितल्याने आणि तेवढे भाडे शेतकऱ्यांना अदा करणे शक्य नसल्याने उत्पादक ते ग्राहक थेट फळे व भाजीपाला विक्रीची संधी आम्ही देऊ शकलो नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी विनामूल्य जागा देण्याबाबत निर्णय घेतलेला असल्याने आता लवकरच राज्यभर शेतकरी आठवडा बाजार शहरी भागात सुरु केले जातील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक डॉ.भास्कर पाटील यांनी केले. याच्या यशस्वितेसाठी शेतकऱ्यांनी आपला सहभाग वाढविणे महत्त्वाचे असून, थेट विक्रीचा लाभ शेतकऱ्यांनाच होणार आहे. फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी मुंबई शहर उपलब्ध झाले असून, त्याचा लाभ शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ.भास्कर पाटील यांनी यावेळी केले. --------------------जागा उपलब्ध करून देणार: महापौरसोलापूर महानगरपालिकेतर्फे नगरसेवकांची बैठक घेऊन शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आठवडा बाजार उभारणी करणे शक्य आहे अशा जागा कृषी, पणन मंडळास या बाजारासाठी उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच फळ महोत्सवासाठीही जागा उपलब्ध करुन देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून, शेतकऱ्याला आवश्यक मदत करण्यात येईल,अशी ग्वाही महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली़