शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत कॉफी करताना पकडलं म्हणून विद्यार्थ्यांनी सुपरवायझरला केली मारहाण, सांगोला येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 15:55 IST

परीक्षेत कॉपी करत असताना पकडून पेपर काढून घेतल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने चक्क सुपरवायझरला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल परिसरात घडली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : परीक्षेत कॉपी करत असताना पकडून पेपर काढून घेतल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने चक्क सुपरवायझरला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल परिसरात घडली़सोलापूर विद्यापीठाच्याच्या वतीने सध्या बीए़ बीकॉमच्या परीक्षा सुरू आहेत़ परीक्षा सुरू असताना सांगोला येथील न्यु इंग्लिश स्कुल येथे बीकॉम २ च्या परीक्षेवेळी पेपर सुरू असताना सुपरवायझर सुयोग शशिकांत दिवटे (वय २५ रा़ वासुद रोड, सांगोला)यांना सुनिल संतोष पाटील (वय २३, रा़ पाटील वस्ती सांगोला) हा विद्यार्थी कॉपी करत असल्याचं आढळून आले़ त्यानंतर सुपरवायझर दिवटे यांनी विद्यार्थी सुनिल पाटील यास कॉपी करण्यास प्रतिबंध केला व नंतर त्यांचा पेपर काढून घेतला़ यानंतर चिडलेल्या विद्यार्थ्यांने सुपरवायझर दिवटे यांना शाळेबाहेर गाठून कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली़या सुपरवायझर सुयोग दिवटे यांच्या छातीवर, डोक्यात, दंडावर, पायावर जखमा झाल्या आहेत़  या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात झाली आहे़ पुढील तपास पोना कांबळे हे करीत आहेत़