सोलापूर : माढा तालुक्यात उपळाई-अंजनगाव दरम्यान अनोळखी तरुणांनी कार अडवून विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश देशमुख(रा़ मोहोळ) यांना शनिवारी रात्री मारहाण केली़ या घटनेत देशमुख आणि त्यांचे दोन साथीदार जखमी झाले असून त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ पोलिसांनी सावध भूमिका घेत मोहोळमध्ये रात्री बंदोबस्त ठेवला़ विभागीय पोलीस अधिकारी मनीषा डुबुले या रात्री उशिरा मोहोळमध्ये पोलिसांचा फौजफाटा घेऊन दाखल झाल्या़
विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण
By admin | Updated: July 6, 2014 00:24 IST