शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासगी दूध संघाचा शासन आदेशाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 05:11 IST

खासगी दूध संघांनी शासन आदेशापेक्षा कमी दर देण्याबाबतचे दरपत्रक दूध संकलन केंद्रांना दिले आहे.

- अरुण बारसकर सोलापूर : खासगी दूध संघांनी शासन आदेशापेक्षा कमी दर देण्याबाबतचे दरपत्रक दूध संकलन केंद्रांना दिले आहे. यात ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ दुधाला २२ रुपये १० पैसे दर दर देण्यात येईल, असे म्हटले आहे. तत्पूर्वी शासन आदेशात २४ रुपये १० पैसे दर देण्यात येईल असे जाहीर केले होते.राज्यात गाईच्या दुधाचा दर १७ रुपयांवर आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर २१ जुलैपासून दर वाढ देण्याचे जाहीर केले होते. खासगी संघांनी काही मुद्दे पुढे करीत दर वाढीची अडचण सांगितली व एक आॅगस्टपासून दरवाढ देण्याचे मान्य केले. याप्रमाणे शासनाने मुख्यमंत्री व सचिवांच्या बैठकीचा संदर्भ देत ३१ जुलै रोजी नवा आदेश काढला.यामध्ये १९ रुपये १० पैसे दूध संघाचे, ५ रुपये शासन अनुदान असे २४ रुपये १० पैसे दूध उत्पादकांना प्रति लिटर मिळणार होते. मात्र, खासगी संघांनी काढलेल्या नवीन दरपत्रकात ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ दुधाला १७ रुपये १० पैसे दर देणार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाºया दरातून दोन रुपये व शासनाकडून प्रति लिटर ५ रुपये असे खासगी संघांना प्रति लिटर ७ रुपये मिळणार आहेत.पावडर प्रति किलो १६० रुपयेदूध पावडरीचे दर १४० रुपये किलो इतके खाली आल्याचे खासगी संघांनी मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत सांगितले होते. एक आॅगस्ट रोजी पावडरीचे दर प्रति किलो १० रुपये व पुन्हा १० रुपयाने वाढले. आता दूध पावडरीचा दर प्रति किलो १६० रुपये असल्याचे सांगण्यात आले. शासन आदेशात फॅट स्टँंडर्डपेक्षा कमी व अधिक प्रति एक पॉर्इंटला ३० पैसे देण्यात येतील असे नमूद केले असताना खासगी संघांच्या दरपत्रकात १० पैसे दिली जाईल असे म्हटले आहे.खासगी संघांनी काढलेले दरपत्रक सर्वांना अडचणीत आणणारे आहे. या दरानेच आमचे शिल्लक दूध घेणार असतील तर आम्ही शेतकºयांना २५ रुपयाचा दर देऊ शकणार नाही.- आ. प्रशांत परिचारक, चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ.

टॅग्स :milkदूध