शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू रामासाठी मांस अन् दारु विक्री बंद करा; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

By शीतलकुमार कांबळे | Updated: January 4, 2024 12:12 IST

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याना पाठविले पत्र.

शीतलकुमार कांबळे, सोलापूर : प्रभू श्रीरामासाठी २१ व २२ जानेवारी रोजी देशात मांस अन् दारु विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाने केली आहे. ह दोन दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा असून ऐतिहासिक दिवस असल्याने ही मागणी मान्य करावी अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी केली.

प्रभु श्रीरामचंद्र मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. त्यामुळे २१ व २२  जानेवारी या दोन दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात मांसाहार व दारु विक्री बंद करण्यात यावी. मांसाहारामुळे असुरी विचार बळावतात असे अनेक ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. असुरी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे. स्वहितासाठी व देश हितासाठी खूपच महत्त्वाचे आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो एक दिवस उपवास करण्याचा संकल्प केला आहे. आपण भारतीयांनी सुद्धा एक संकल्प केला पाहिजे. तो म्हणजे हा एक दिवस तरी पुर्ण सात्विक आहार घेऊन आपली सेवा श्रीरामाचे चरणी अर्पण करावी . तसेच आपल्या परिसरातील मंदिर, सार्वजानिक हॉल अशा ठिकाणी २२ जानेवारी रोजी भजन, कीर्तन, प्रवचन, कथा करुन उत्सव साजरा करावा, हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे, असे प्रयत्न सर्वांनी करावेत असे आवाहन ही इंगळे महाराज यांनी केले.       

महाराष्ट्र शासनाचे माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार व दारु विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे देण्यात आले आहे असे सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर