शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आई जमीन नावावर करत नाही म्हणून सावत्र मुलाने केली तिची हत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 18:57 IST

जमीन नावावर करत नाही म्हणून आईच्या डोक्यावर कोयत्याने लोखंडी हत्याराने वार करुन  सावत्र मुलांनी शुक्रवारी रात्री केवड येथे राहत्या घरासमोर तिचा खून केला़ ही घटना केवड (ता़ माढा) येथे घडली़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर/माढा - जमीन नावावर करत नाही म्हणून आईच्या डोक्यावर कोयत्याने लोखंडी हत्याराने वार करुन  सावत्र मुलांनी शुक्रवारी रात्री केवड येथे राहत्या घरासमोर तिचा खून केला़ ही घटना केवड (ता़ माढा) येथे घडली. राजाबाई उर्फ राणी हरिश्चं़द्र पवार असे खून झालेल्या आईचे नाव आहे़ याबाबतची फिर्याद कमलाबाई रमेश काळे (रा डोणज ता मंगळवेढा) हिने माढा पोलीस ठाण्यात दिली़  याप्रकरणी राहुल पवार व कृष्णा पवार या दोघांना ताब्यात घेतले आहे़ ही घटना समजताच पोलिस उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांनी व माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली आहे़ हरिश्चंद्र मनसुख पवार याच्याबरोबर राजाबाई उर्फ राणी पवार यांचे लग्न झाले होते़ हरिश्ंद्र पवार याची ही दुसरी पत्नीस आहे पहीली पत्नी सुशिला ही मयत झाल्यावर दुसरी केली  असुन केवड गावात हे कुटूंब राहत आहे़ दुसरी पत्नी राणी उर्फ राजाबाई हिच्या नावे कुवड येथे पाच एकर व जामगाव येथे दोन एकर जमीन आहे़ ही जमीन आमच्या नावावर कर म्हणुन रागाच्या भरात मुलानी आईचा खुन केला़या प्रकरणी समीर हरिश्चंद्र पवार,राजेंद्र हरिश्चंद्र पवार,गणेश हरिश्चंद्र पवार,लक्ष्मी हरिशचंद्र पवार या तिघां सावत्र मुलासह व एक सावत्र मुलगी अशा चौघांविरोधात माढा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सावत्र मुलगा राहुल पवार याची बायको ही मयत राजाबाई पवार यांनी पळवुन लावल्याच्या संशयावरुन हा खून केल्याचे फियादीत नमुद केले आहे.शुक्रवारी रात्री  आठ वाजता  राजाबाई उर्फ राणी  पवार या आपल्या कुटूबिंयासह घराच्या बाहेर अंगणातील उजेडात बोलत बसल्या होत्या. अचानक राजाबाई पवार यांच्या घरासमोर येऊन तु आमच्या नावावर जमीन का केली नाही, तु राहुल पवारची बायको का पळवुन लावली असे म्हणत या चोघांनी आईच्या डोक्यावर, मानेवर कोयत्याने वार करुन तिचा खून केला़ या चौघांना अडविण्याचा प्रयत्न केला असता मयत मुलीची आई कमलाबाई काळे व मुलगी लक्ष्मी पवार,हिम्मत शिंदे या तिघांना मारहाण करण्यात आली. लक्ष्मी पवार हिच्या हातावर एक वार केला गेला आहे़ राहुल पवार व कृष्णा पवार या दोघांना माढा पोलिसांनी अटक केली असुन वसंत पवार व फुलाबाई पवार हे दोघे फरार आहेत. माढा पोलिस त्याचा तपास करीत आहेत. माढा ग्रामीण रुग्णालयात मयत राजाबाई पवार यांचे शवविच्छेदन शनिवारी करुन प्रेत ताब्यात दिले आहे़

टॅग्स :Murderखून