शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By admin | Updated: March 18, 2017 20:08 IST

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुखसोलापूर : सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सर्वांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सर्वसमावेश अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. या अर्थसंकल्पात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या अधिक बळकट करण्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतातून शेतमाल काढल्यानंतर तातडीने आडत्याला विकण्याऐवजी तो तारण ठेवून, पैशांची गरज भागावी आणि बाजारपेठेतील गरजेनुसार शेतमालाला योग्य आणि वाजवी दर मिळावा या उद्देशाने शेतमाल तारण योजनेसाठी ५० कोटी, आणि ग्रो मार्केटसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मिलवाईज निर्यात कोठा पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांना सन २०१५-१६ चा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित होते. केंद्र शासनाने साखर कारखान्याबाबतचे निर्यात कोटा धोरण मागे घेतले असल्याने सन २०१५-१६ या वषार्साठी नियार्तीची अट असणार नाही. शेतकऱ्यांना रास्त किफायतशीर भाव देता यावेत. याकरिता सन २०१५-१६ आणि २०१५-१६ साखर कारखान्यांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दोन्ही वषार्चा एकत्रित विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देण्याकरीता कारखान्यांकडे रु.७०० कोटी उपलब्ध होणार आहेत, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर कोकणात काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून नवीन गोदाम बांधकामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. एकंदरीत उद्योग, व्यवसाय, शिक्षण, शेती व रोजगार यासाठी सरकारने भरघोस निधी दिला आहे. राज्याचा विकासदर वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यातील ८२ हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्धारसुद्धा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न दुपट्ट वाढवून कर्जमुक्त करण्याचे स्वप्न सरकारचे आहे. सोलापूर विमानतळाचा विकास आणि सोलापुरी चादर व टॉवेल करमुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूरच्या रोजगाराला व विकासाला चालना मिळणार आहे. एकूणच अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करून व शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून झुकते माप दिले आहे. अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून स्वागतार्ह आहे.