शिवाजी महाविद्यालयापासून या सायक्लोथॉन रॅलीचा शुभारंभ शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बापू शितोळे, रिजन चेअरमन अभिजित जोशी, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, नगरसेवक संतोष बारंगुळे, झोन चेअरमन रवी बजाज, प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, मातृभूमीचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, प्रोजेक्ट चेअरमन अमित इंगोले, इनरव्हीलच्या अध्यक्षा हेमा कांकरिया, सचिव गुंजन जैन, गौरी रसाळ, रोटरीच्या सचिव स्मिता शामराज, लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश चौहान, अभिजित तांबारे, सायकल असो.चे चंद्रकांत बारबोले, द्वारकेश डोईफोडे आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा विद्यार्थी आणि गट अशा दोन गटांत घेण्यात आली. लहान मुलांची ४ कि.मी., तर खुल्या गटात १६ किलोमीटर अंतर देण्यात आले होते. सहभागी सायकलस्वारांनी ४५ मिनिटांत हे अंतर पार केले. यात सहा ते ६५ वर्षे वयोगटातील सायकलस्वारांनी भाग घेतला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आले. क्लबचे खाडे यांनी सायकल वापराचे फायदे सांगितले. या उपक्रमाचे महाराष्ट्र सायकल असो.ने कौतुक केले. सूत्रसंचालन गौरी रसाळ यांनी केले. आभार गुंजन जैन यांनी मानले.
कोण काय म्हणाले...
यानिमित्ताने बार्शीच्या इतिहासात प्रथमच सामाजिक काम करणारे
लायन्स व रोटरी क्लब एकत्र आले. प्रास्ताविकात ही केवळ स्पर्धा नसून वाढत्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आळा बसावा, तंदुरुस्त राहावे व लोकांमध्ये वाहनापेक्षा सायकल बरी याविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशानेच या सायक्लोथॉनचे आयोजन केल्याचे प्रकल्प प्रमुख अमित इंगोले यांनी सांगितले.
आसिफ तांबोळी यांनी भाषणातून सामाजिक संघटनांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाद्वारे बार्शीकरांना शारीरिक तंदुरुस्तीची सवय लागेल, असा आशावाद व्यक्त केला. जयकुमार शितोळे म्हणाले, धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण बिझी झाला आहे. अशा उपक्रमांमुळे जागृत होण्यास हातभार लागेल.