शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलताना रेल्वेच्या सिग्नलला आपटले डोके !

By admin | Updated: August 3, 2016 12:08 IST

कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी हुतात्मा एक्‍स्प्रेसने निघालेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झाला.

आयटीआय प्रवेशासाठी निघालेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू 
 
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ -  कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी हुतात्मा एक्‍स्प्रेसने निघालेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झाला. वाकाव (ता. माढा) येथे मोबाईलवर बोलत असताना रेंज येत नसल्याने तो रेल्वेच्या दरवाजाजवळ उभा होता. रेल्वे सिग्नलला डोके आपटून तो खाली पडल्याने ही घटना घडल्याचे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले. 
अक्षय चतुर्भूज बारबोले (वय 22, रा. कल्याणनगर, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. मूळचे माढा तालुक्‍यातील सीना दारफळ येथील रहिवासी असलेले बारबोले कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने गेल्या 15 वर्षांपासून सोलापुरात राहत आहेत. अक्षयचे वडील होटगी रोडवरील शिवशाही कंपनीत नोकरीला आहेत. कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी अक्षय  सकाळी हुतात्मा एक्‍स्प्रेसने कुर्डुवाडीकडे निघाला होता. वाकाव परिसरात मोबाईलवर बोलत असताना रेंज येत नसल्याने त्याने डोके बाहेर काढले होते. रेल्वे सिग्नलला डोके आपटून तो खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला रेल्वे कर्मचाऱ्यांनी कुर्ला गाडीने कुर्डुवाडी रेल्वेस्थानकावर आणले. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. 
घटनेची माहिती कळताच बारबोले कुटुंबीयांना धक्का बसला. कुर्डुवाडी येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अक्षयच्या मागे आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.