शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल बाराशे हेक्टरवर खरीप मका, बाजरीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

सांगोला तालुक्यात यंदा रोहिणी नक्षत्राच्या (मान्सूनपूर्व ) पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले होते. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी ...

सांगोला तालुक्यात यंदा रोहिणी नक्षत्राच्या (मान्सूनपूर्व ) पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले होते. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून पेरणीसाठी सज्ज झाला होता; परंतु तालुका कृषी विभागाकडून तालुक्यात ९ मंडळनिहाय सरासरी ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर व वापसा होताच परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन केले होते; परंतु कृषी विभागाच्या आवाहनानंतरही शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरलीच.

आतापर्यंत झालेला पाऊस व वापसा होताच शेतकऱ्यांनी बाजरी ६२५ हेक्टर, मका ५६० हेक्टर, तूर १५ हेक्टर, उडीद ४ व सूर्यफूल ६ हेक्टर अशा एकूण १२१० हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत, तर अनेक भागात शेतकरी खरीप पेरणीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मृग नक्षत्र २० जूनपर्यंत असल्याने या कालावधीत दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. या कालावधीत पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

कोट ::::::::::::::::::::::

प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत बाजरीचे २९.२२ क्विंटल बियाणे खरेदी विक्री संघ सांगोला यांच्याकडे उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या मंडळामधील अगर तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधून बाजरी बियाणे अनुदान रकमेवर घेऊन जावे.

- रमेश भंडारे

प्रभारी तालुका कृषी अधिकारी

ट्रॅक्टरच्या पेरणीला शेतकऱ्यांची पसंती

बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेतकरी बैलजोडीऐवजी यांत्रिकीकरणाला पसंती देऊ लागले आहेत. तालुक्यात ट्रॅक्टरद्वारे पेरणीसाठी एकरी ८०० ते ९०० रुपये तर दोन बैलजोड्यांसाठी दिवसाला ५ हजार रुपये ३ ते ४ एकर पेरणीसाठी दर आहे. तसे पाहता शेतकऱ्याला सध्या बैलाकरवी पेरणी महाग पडत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या पेरणीलाच अधिक पसंती देत आहेत.