शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कुणी भजन गायलं,कुणी कोरडा रंग उधळला कुणी तिरडी काढली..म्हणाले आज होली है...

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 12, 2023 18:35 IST

संस्कृतीप्रिय, उत्सवप्रिय शहरात कोरोनातील दोन वर्षानंतर यंदा मुक्त वातावरणात रंग खेळला गेला.

सोलापूर : संस्कृतीप्रिय, उत्सवप्रिय शहरात कोरोनातील दोन वर्षानंतर यंदा मुक्त वातावरणात रंग खेळला गेला. काही व्यापा-यांच्या सोसायट्यांमध्ये भजन गात लहान मुलाची पहिली रंगपंचमी साजरी केली. याबरोबरच काही ठिकाणी काेरडार रंग खेळत शांतताप्रियता दाखवली. गजबजलेल्या भवानी पेठेत काही तरुणांनी गलका करीत चक्क तिरडी काढून रंग उधळला. काही ठिकाणी नियमतीपणे ओला रंग लावूला तर काही चौकात काही तरुणांनी अंडी फेकून रंगोत्सव साजरा केला. राजस्थानी बांधवांचा 'धुंड'

राजस्थानी समाजात जन्मून एक वर्ष झालेल्या लहान मुलांची पहिली रंगपंचमी ही 'धुंड' या अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धती रूढ आहे. एक वर्षाच्या मुलाला नवीन पांढरे कपडे घालून त्याच्या गळ्यात साखरेचा हार घालून ओवाळत कोरडा रंग लावून डपली वाजवून भजन गातात. सम्राट चौकात भगवती सोसायटीत भाजपचे शहर अध्यक्ष अनुप खंडेलवाल यांचा मुलगा मयंक यास नवीन कपडे घालून रंग लावत भजन गायले. त्याच्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव केला. खेलो, खेलो रे होली के रंग मे खेले..अशी गाणी सादर केली.  मजुर, कामगारांना भेटवस्तू देत लावला रंग

लष्कर परिसरात मंडप डेकोरेटर कामगार, बांधकाम मजुर, रंगकाम करणारे कामगार यांना दरवर्षीप्रमाणे भेट वस्तू देऊन मालकाकडून रंग लावला जातो. त्यांना अल्पोपहार देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याची पद्धत आहे. जय जगदंबा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यानी त्या मजुरांना रंग लावत आनंद व्यक्त केला. अध्यक्ष विशाल हुललंतीवाले यांनी सोलापुरात १०० हून अधिक वर्षाची परंपरा असल्याचे म्हणाले. 

चार तास चालल्या पाच किलोमीटर रंग गाड्या  

दरवर्षीप्रमाणे सोलापूर शहरात लोधी समाजाच्या वतीने रंग गाड्यांची मिरवूणक काढून शहर वासियांवर रंगाची उधळण केली. या बैलगाड्यांमध्ये रंग पाण्यांनी भरलेल्या टिपेतून पिचका-या फवारत येणा-या जाणा-यांवर रंग उधळला. कोणी रागावला तर त्याला होली है भाई म्हणत त्याच्या चेह-यावर हसू फुलवण्याची प्रथा यंदाही जपली. बेडर पूल परिसरात बालाजी मंदिरात भगवान बालाजीला सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांच्या हस्ते रंगाचा टिळा लावून रंगपंचमीला सुरुवात करण्यात आली.बेडी पूल, भाजी मंडई, सतनाम चौक, कुंभार गल्ली, मौलाली चौक, जगदंबा चौक मार्गे दुपारी ३ वाजता १२२ रंगगाड्या निघाल्या. पाच किलो मीटरचा परिसर कव्हर करीत चार तासात येणा-या जाणा-यांवर रंग उधळला. 

 भवानी पेठेत तिरडी काढली 

भवानी पेठेत तरुणांनी चक्क तिरडी काढून गेली माझी सक्की बायको गेली...म्हणत पाठीमागून रंग उधळत हशा पिकवला. ढोर गल्ली आणि बलीदान चौकातील या तरुणांनी अशा अनोख्या पद्धतीने रंगोत्सव करीत सोलापूरकरांचे लक्ष वेधले.