शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Solapur: बा विठ्ठला राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर कर; उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे साकडे

By appasaheb.patil | Updated: September 8, 2023 15:44 IST

Solapur: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आज पहाटे नित्यपूजा करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या सोबत त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.

- आप्पासाहेब पाटीलपंढरपूर - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आज पहाटे नित्यपूजा करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या सोबत त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या. याचवेळी गोऱ्हे यांनी बा विठ्ठला राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर कर असे विठ्ठलाकडे साकडे घातले.

विठ्ठलाच्या पूजेवेळी अनुसया फसळकर यांनी म्हटलेला काकडा डॉ. गोऱ्हे यांना प्रचंड भावला. शक्य असल्यास मंदिर प्रशासनाने या काकड्याचे शब्दांकन करावे असे  डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच घरांमध्ये पिढ्यानपिढ्या श्रावण महिन्यात पंढरपूरच्या श्री. विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे, त्यानिमित्ताने आज विठ्ठलाची सेवा करण्याचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून विठ्ठलाकडे प्रार्थना केली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

याप्रसंगी, श्री. विठ्ठल मंदिर प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी विठ्ठल मंदिरातील नित्योपचार विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरNeelam gorheनीलम गो-हे