शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सोलापूर महापालिका कर्मचाºयांची हजेरी आता पोर्टलद्वारे, नोंदणीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 14:12 IST

मुंबई महापालिकेनंतर सोलापूर महापालिकेने शासनाच्या अटेंडंट पोर्टलद्वारे मनपातील कर्मचाºयांची हजेरी नोंदविण्याची तयारी केली आहे. 

ठळक मुद्देएमएचएसएमसी या नावे सोलापूर मनपाची वेब सुरू करण्यास एनआयसीकडे नोंदणी कर्मचाºयांना हजेरी नोंदविणे सोपे होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : मुंबई महापालिकेनंतर सोलापूर महापालिकेने शासनाच्या अटेंडंट पोर्टलद्वारे मनपातील कर्मचाºयांची हजेरी नोंदविण्याची तयारी केली आहे. मुंबई महापालिकेतील सुमारे सव्वालाख कर्मचाºयांची हजेरी शासनाच्या अटेंडंट पोर्टलद्वारे घेतली जाते. यात कर्मचारी जेथे काम करीत आहे, तेथील संगणकाशी जोडलेल्या डिव्हाईसवर बोट ठेवून हजेरी नोंदवू शकेल. यामुळे कर्मचाºयांना हजेरी देण्यासाठी करावी लागणारी धावपळ वाचणार आहे. हजेरी पुस्तकापर्यंत पोहोचणे, तेथील रांगेत थांबणे ही कटकट संपविण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अंमलात आली. पण यासाठी बायोमेट्रिक संच खरेदीसाठी खर्च येतो. याशिवाय प्रत्येक विभागात एकच संच बसविला तर कार्यालय सुरू होताना व बंद होताना कर्मचाºयांना रांगा लावाव्या लागत होत्या. त्यावर शासनाने वेबपोर्टलवर अटेंडंट डॉट जीओ ही सुविधा उपलब्ध केली आहे. मुंबई महापालिकेने एमएचएमसीजेएम या नावे वेब हजेरी या पोर्टलवर सुरू केली आहे. याच धर्तीवर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बुधवारी एमएचएसएमसी या नावे सोलापूर मनपाची वेब सुरू करण्यास एनआयसीकडे नोंदणी केली आहे. वेब पोर्टलची लिंक देण्याचे अधिकार एनआयसीकडे आहेत. ही लिंक मिळाल्यावर मनपातील सर्व संगणकांना ही जोडली जाईल व सर्व विभाग व कार्यालयात असे डिव्हाईस जोडले जातील. या डिव्हाईसचा खर्च खूपच कमी असून, कर्मचाºयांना हजेरी नोंदविणे सोपे होणार आहे. -----------------------हजेरीचे होणार फायदे..वेब पोर्टलवरील हजेरीमुळे कर्मचाºयांना कोणत्याही संगणकावरील डिव्हाईसवर हजेरी देणे सहज शक्य होईल. कार्यालयीन वेळेत किती कर्मचारी आले हे लागलीच समजून येईल. तसेच कर्मचारी कोणत्या वेळी कोणत्या विभागात काम करीत आहे हे दिसून येईल. एका क्लिकवर सर्व कर्मचाºयांचे हजेरी रेकॉर्ड समोर येईल. सफाई कर्मचाºयांना हजेरीची सुविधा कशी द्यायची याबाबत तपासणी केली जात आहे.