शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचा जवान मध्यप्रदेशमध्ये शहीद

By admin | Updated: March 31, 2017 19:55 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूर सांगोला : बबिना (मध्यप्रदेश)येथे युध्दजन्य परिस्थितीचा सराव करताना लक्ष्मीनगर(ता.सांगोला)येथील भोजलिंग मोहन काळेल-25 हा जवान गुरुवारी रात्रौ साडेनऊ च्या सुमारास शहीद झाला आहे. त्याच्यावर शनिवार 1 एप्रिल रोजी स.11 वा.शासकीय इतमामात त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी दिली आहे. शहीद जवान भोजलिंग काळेल याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे. जवान भोजलिंग काळेल याचा अवघ्या चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. त्याच्या शहीद होण्यामुळे लक्ष्मीनगर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अंत्यविधीसाठी प्रशासनाने गावातील जागा निश्चित करण्यासाठी गाव कामगार तलाठ्यांना गावात पाचारण केले आहे. अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाच्या वतीने अधिकारी वर्ग उपस्थित राहणार असल्याचे तहसिलदार संजय पाटील, पो.नि.हारुण शेख यांनी सांगितले.     लक्ष्मीनगर येथील भोजलिंग मोहन काळेल हा युवक तीन वषार्पूर्वी 69 वी रणगाडा रेजिमेंट पंजाब मध्ये भरती झाला होता. मागील तीन वषार्पासून तो या रेजिमेंट मध्ये कार्यरत आहे. सध्या तो मध्यप्रदेश (बबिना)येथे युध्दजन्य परिस्थितीचा सराव करीत होता. गुरुवारी रात्रौ साडेनऊच्या सुमारास युध्दजन्य परिस्थितीचा सराव करताना शहीद झाला. बबिना येथून अधिका?्यांनी भोजलिंग शहीद झाल्याची दु:खद बातमी वडील मोहन काळेल यांना दुरध्वनी वरुन कळविली. आपला मुलगा शहीद झाल्याचे समजताच त्यांच्या कुटूंबीयांना आश्रु आनावर झाले. या दु:खद घटनेची बातमी लक्ष्मीनगर गावात समजताच सर्वांनी भोजलिंग काळेल याच्या घराकडे धाव घेत सहभागी झाले. जवान भोजलिंग काळेल याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाख्याची असून त्याचे आई, वडील मोलमजूरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. भोजलिंगच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबीयाचा आधार गेल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान जवान भोजलिंग काळेल याचे पार्थिव शुक्रवारी रात्रौ 7 वा.बबिना येथून शववाहिकेतून शनिवारी सकाळी 11 वा.पर्यंत लक्ष्मीनगर येथे आणण्यात येणार असून त्यांच्यासमवेत रणगाडा रेजिमेंटचे अधिकारीही असणार आहेत. भोजलिंग काळेल यांच्यावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने अंत्यसंस्काराची तयारी पुर्ण करण्यात आली आहे.  अहमदनगर येथून सैनिक व सोलापूर येथून पोलीसांचे पथक भोजलिंगला मानवंदना देण्यासाठी येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी सांगितले.