शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-इंद्रायणी रेल्वे बंद, पुण्यासाठी सोलापूर आगाराकडून एसटीच्या १६ जादा गाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:17 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देइंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे चार महिने बंद राहणारसोलापूर-पुणे मार्गावर सोलापुरातून जाणाºया प्रवाशांची संख्या अधिकसोलापूरसह अक्कलकोट, बार्शी आणि कुर्डूवाडी आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. सोलापुरातून  दुपारच्यावेळी सुटणारी इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे चार महिने बंद राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर-पुणे मार्गावर सोलापुरातून जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे. दररोज जाणाºया चाकरमान्यांचाही यात समावेश आहे. दुपारी सोलापूर येथून निघणाºया इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. ही सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यांना सुलभ सेवा मिळावी या दृष्टीने विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सोलापूरसह अक्कलकोट, बार्शी आणि कुर्डूवाडी आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. या नियोजनाप्रमाणे सोलापूरच्या बसस्थानकातून स्वारगेटपर्यंत सकाळी ११ वाजता, दुपारी १२.१५, १२.४५, १.४५ आणि २.४५ या वेळेत पाच जादा गाड्यांच्या फेºया वाढवण्यात आल्या आहेत. याच गाड्या स्वारगेटहून सकाळी ६.१५, ७.१५, ८.१५, सायंकाळी ६.३०, ७.३० या वेळेत सुटणार आहेत. सोलापूर आगाराच्या जाण्यायेण्याच्या मिळून दररोज १० फेºया अधिक वाढल्या आहेत.अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अक्कलकोट ते स्वारगेट पाच फेºया वाढवल्या आहेत. पहिली गाडी सकाळी १० वाजता सुटेल. त्यानंतर दुपारी १२, १२.४५, ३.१५ आणि ४.१५ असे वेळापत्रक ठरले आहे. स्वारगेटहून अक्कलकोटला येणारी पहिली गाडी तेथून पहाटे ५.१५ ला सुटेल. त्यानंतर सकाळी ७.१५, ८.१५, सायंकाळी ५.१५ आणि ७.१५ अशी सुटणार आहे. भगवंतनगरी बार्शी येथून स्वारगेटसाठी कुर्डूवाडीमार्गे जादा तीन फेºया वाढवण्यात आल्या आहेत. यात पहिली गाडी दुपारी ३.३० ला सुटणार आहे. दुसरी ४.१५ आणि सायंकाळी ५ वाजता सटेल. स्वारगेटहून सकाळी ८.१५, ९.१५ आणि १०.१५ वाजता या गाड्या बार्शीकडे येण्यासाठी सुटणार आहेत. कुर्डूवाडी बसस्थानकावरुन दुपारी ३.३० वाजता स्वारगेटकडे पहिली बस सुटणार आहे. त्यानंतर ४.१५ आणि सायंकाळी ५ वाजता तर स्वारगेटहून कुर्डूवाडीसाठी सकाळी ८.१५, ९.४५ आणि १०.४५ अशा परतीच्या गाड्यांचे वेळापत्रक ठरले असल्याचे विभाग नियंत्रक गायकवाड यांनी स्पष्ट केले. -----------------------दिवसभरात ३२ फेºयांचे नियोजन...आजपासून जिल्ह्यातील ४ आगारातून पुणे स्वारगेटसाठी १६ फेºयांचे नियोजन आखले आहे आणि स्वारगेटहून परतीच्या १६ फेºया अशा ३२ फेºया वाढवण्यात आल्या आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेसने पुण्याकडे जाणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यांना सुलभ सेवा मिळावी या दृष्टीने तो प्रवासी आकर्षित करण्यासाठी एस. टी. प्रशासनाने हे नियोजन आखले आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.