शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 11:53 IST

सोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी झालेली निवडणूक राजकीयदृष्ट्या चर्चेची ठरली. यात सात जागांसाठी आठ उमेदवार उभे होते. त्यातील सात जागांवर राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या चार जागा निवडून आल्या. तर तीन जागा सत्तापक्षाला मिळाल्या. सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंह शिंदे अखेरच्या फेरीतही ८२६ मतांचा कोटा गाठू शकले नाहीत. त्यामुळे यांचा अनपेक्षित पराभव झाला. नगरपालिका गटातही राष्टÑवादीनेच बाजी मारली. तीन उमेदवारांमधून मंगळवेढ्याचे नगरसेवक अजित जगताप यांनी ९८ मते मिळवून विजय संपादन केला. येथीलच शिवसेनेचे नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी यांना ९४ मते मिळाली. शिवसेनेसह असलेल्या महाआघाडीत असलेल्या १६० मतांवर नगरपरिषद प्रवर्गात मात केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले. सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी गटाचे चार उमेदवार रिंगणात होते. तीन विजयी झाले. रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला. तर वसंतराव देशमुख, अतुल पवार, भारत शिंदे यांचा विजयझाला. राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे चारही उमेदवार निवडून आले. शेकापचे सचिन जाधव यांनी १३ मतांचा पल्ला गाठला. उमेश पाटील पहिल्या फेरीत विजयी झाले. विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांची मते दुसºया फेरीत वाढली. तर शिवसेनेचे नीलकंठ देशमुख यांना सहाव्या फेरीपर्यंत लढत देऊन विजय मिळवावा लागला.---------------------एक झालो, आता एकत्र राहणार - साठे४या विजयावर प्रतिक्रिया देताना पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ असूनही केवळ चुकीच्या नियोजनामुळे आम्हाला सत्ता स्थापन करता आली नव्हती. मात्र यावेळी सर्वांना सोबत घेऊन योग्य नियोजन केले. सर्वांची मते विचारात घेतली, त्यामुळे हे यश मिळाले आहे. आता एकत्र आलो आहोत, पुढेही एकत्र राहून काम करू, असे ते म्हणाले. विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दीपक साळुंखे, रश्मी बागल, राजूबापू पाटील, लतिफभाई तांबोळी या सर्वांच्या सहकार्यातून हे यश मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला.-------------------नियोजनात आम्ही चुकलो - संजय शिंदे४या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाले, आम्ही नियोजनात चुकलो हे मान्य करावेच लागेल. नियोजनाच्या काळात आपण गावात नव्हतो, त्यामुळे त्यात भाग घेता आला नाही. १० चा कोटा केला होता. त्याचाही फटका बसला असावा. आम्हाला अतिविश्वास नडला. केवळ एक-दोन मतांमध्ये गोंधळ झाल्याने सर्व जागांवर विजय मिळविता आला नाही, हे त्यांनी मान्य केले. नगरपालिका स्तरावरही राष्टÑवादीच्या उमेदवाराचा विजय झाल्याच्या मुद्यावर ते म्हणाले, स्थानिक स्तरावर विषय वेगळे असतात. त्यामुळे तिकडे आम्ही मागे पडलो, असे म्हणता येणार नाही.-------------आघाडीची नऊ मते फुटली४राष्टÑवादी आणि मित्रपक्षांकडे २७ मते असताना त्यांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ३६ मते मिळाली. यावरून सत्ताधारी गटाची नऊ मते फुटली, असे सांगितले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सचिन देशमुख यांनीही या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना पहिल्या पसंतीची १३ मते मिळाली. आपणास १५ मते मिळणार होती. मात्र दोन मते सहकारी उमेदवारांना देण्यासाठी आपणच सांगितले, असे देशमुख म्हणाले.