शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सोलापूर विभागाला पाच गाड्या मंजूर

By admin | Updated: July 9, 2014 00:08 IST

रेल्वे अर्थसंकल्प : गदग-पंढरपूर टुरिस्ट ट्रेन

सोलापूर : केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोलापूरकरांच्या पदरी फारसे काहीच पडले नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला पाच गाड्यांना मंजुरी मिळाली असून, सोलापूरसाठी बीदर-सीएसटी (मुंबई) ही एकमेव गाडी मिळाली आहे. गदग-पंढरपूर या टुरिस्ट गाडीस मंजुरी देतानाच सोलापूर-तुळजापूर मार्गाचे सर्वेक्षण करून रेल्वेमंत्र्यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. मंजुरी मिळालेल्या अहमदाबाद-चेन्नई ही गाडी सुरू झाल्यास ती सोलापूर, वाडीमार्ग धावणार आहे. आठवड्यातून दोनवेळा ही गाडी सोडण्यास मंजुरी मिळाली आहे. बीदर-मुंबई ही नवी गाडी कुठल्या मार्गावरून धावेल, याबाबत रेल्वे प्रशासनही संभ्र्रमावस्थेत आहे. ही गाडी गुलबर्गा-सोलापूरमार्गे अथवा लातूर-सोलापूरमार्गे अथवा परळी वैजनाथ, औरंगाबाद, भुसावळ या मार्गेही धावू शकते. मार्ग निश्चित झाल्यावरच या गाडीविषयी बोलणे बरे होणार असल्याच्या प्रतिक्रियाही ऐकावयास मिळाल्या. विभागाचा विचार केला तर नागपूर-पुणे ही साप्ताहिक (मनमाड, दौंडमार्गे) आणि हजरत निजामोद्दीन-पुणे (भुसावळ, दौंडमार्गे) या दोन गाड्या मिळाल्या आहेत. ---------------------------देवीभक्तांना दिलासासोलापूर-तुळजापूर मार्गाच्या सर्वेक्षणास अर्थसंकल्पात मंजुरी देऊन सदानंद गौडा यांनी देवीभक्तांना दिलासा दिला आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किती अवधी लागेल, याचा नेम नाही. याआधी सोलापूर-जळगाव मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली होती. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊनही हे काम अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे सोलापूर-तुळजापूर मार्गाचा विषय कागदावरच राहू नये, अशी देवीभक्तांची अपेक्षा आहे.