शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सोलापूर जिल्ह्यातील २६५ गावांत होणार १५ हजार ३५० कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानाचा २०१७-१८ चा आराखडा जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पीय वर्षात सहा महिने लोटल्यानंतर आराखडा सादर होतोयगेल्या वर्षीची काही कामे अपूर्ण यंदा १५ हजार ३५० कामांचा प्रस्ताव असून, त्यासाठी २४१ कोटी ९६ लाखांचा खर्च अपेक्षित

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानाचा २०१७-१८ चा आराखडा जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. अर्थसंकल्पीय वर्षात सहा महिने लोटल्यानंतर आराखडा सादर होतोय. गेल्या वर्षीची काही कामे अपूर्ण आहेत. त्यानंतर यंदा १५ हजार ३५० कामांचा प्रस्ताव असून, त्यासाठी २४१ कोटी ९६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण राज्यातच अशी परिस्थिती आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत पुणे विभागातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुणे विभागात २०१५-१६, २०१६-१७ या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय २०१७-१८ मधील प्रस्तावित कामांची माहिती घेतली जाणार आहे. या बैठकीपूर्वीच जिल्हा प्रशासनाने २०१७-१८ मधील कामांचा प्रस्ताव सादर केला आहे. मागील वर्षात विविध विभागाकडून ९९३३ कामे प्रस्तावित होती. यातील ९३०६ कामे पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत आहे.  लघुपाटबंधारे आणि कृषी विभागाने करमाळा, बार्शी तालुक्यात केलेली कामे बोगस असल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत तक्रार न आल्याने कारवाई झाली नसल्याचेही प्रशासनाकडून सांगत असले तरी आढावा बैैठकीत लोकप्रतिनिधी काय करतात याकडे लक्ष आहे. ---------------------------आज आढावा, उद्या पाहणीजलसंधारण मंत्री राम शिंदे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पुणे विभागातील कामांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला पुणे विभागातील पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर या योजनेत पुरस्कार पटकावणारे गावी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांचा गौरवही होणार आहे. उद्या गुरुवारी जलसंधारणमंत्री राम शिंदे आपल्या सोयीनुसार जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणीही करणार आहेत. ---------------------------सर्वाधिक काम अक्कलकोट तालुक्यात होणारजलयुक्त शिवार योजनेत उत्तर सोलापूर तालुक्यात ७, दक्षिण सोलापूर ३६, अक्कलकोट ५३, मोहोळ २७, माढा २१, करमाळा २४, बार्शी ४२, पंढरपूर १५, सांगोला १२, मंगळवेढा १०, माळशिरस १८ अशा २६५ गावांमध्ये कामे होणार आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कपार्टमेंट बंडिंगसह २४ प्रकारची कामे होणार आहे. यंदा क्षेत्रीय उपचारांना प्राधान्य असेल. यातून १ लाख ५१ हजार ५५२ हेक्टर क्षेत्राला लाभ होण्याचा अंदाज आहे. २०१५-१६ मध्ये २८० गावात, २०१६-१७ मध्ये २६५ गावात कामे झाली होती. आजवर जिल्ह्यातील ७१ टक्के गावांची निवड झालेली आहे.