शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँक ‘केडर’ ला चौकशीचा फेरा

By admin | Updated: March 31, 2017 14:27 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सचिवांचे जिल्हा देखरेख संघ अर्थात केडरच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी चार पथके तयार केली असून, केडरला दप्तराची मागणीही केली असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा मध्यवर्ती बँक व त्या अंतर्गत असलेल्या विकास सोसायट्यांचा कारभार सहकार खात्यापेक्षा त्या-त्या तालुक्याच्या वजनदार संचालकांच्या इशाऱ्यावर चालतो. त्यामुळेच जिल्हा बँकेच्या संचालकांच्या इशाऱ्यावर पाहिजे त्यांना मुबलक कर्ज वाटले तर विरोधकांंना क्षमता असूनही कर्ज दिले जात नाही. आज चुकीच्या कर्ज वाटपामुळेच जिल्हा बँक अडचणीत आली आहे. यामुळेच केडरची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. ही बाब सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मनावर घेऊन जिल्हा उपनिबंधकांना सचिवांच्या केडरची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी करण्याची रितसर मागणी उत्तर सोलापूर तालुका भाजपाचे अध्यक्ष काशिनाथ कदम यांनी केली होती. कदम यांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून आठवडाभरात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. -----------------------उत्तरच्या संस्था सहकारमंत्र्यांच्या रडारवरच् उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा युती झाली होती. युतीच्या प्रचाराच्या सभेत जि.प. माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी केडर बरखास्त करण्याची मागणी केली होती.- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. या शिवाय तालुक्यातील अन्य सहकारी संस्थांचीही चौकशी करण्यात येईल असे देशमुख म्हणाले होते.- बाजार समितीच्या चौकशीनंतर आता उत्तर तालुक्यातील सहकारी संस्था सहकार मंत्र्यांच्या रडारवर आहेत.- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील वर्षीच्या लेखा परीक्षणातही गंभीर दोष आढळल्याने संचालक मंडळ अडचणीत आले असून त्याच्या चौकशीसाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत. -----------------चौकशीसाठी पथक तयार करण्यात आले असून मार्च अखेरमुळे दोन दिवसानंतर चौकशीला सुरुवात होईल. आठवडाभरात दप्तराची तपासणी होईल. १० मुद्यांवर चौकशी केली जाईल.-विष्णू डोकेजिल्हा विशेष लेखा परीक्षक ------------------देखरेख संघ केडरबाबत अनेक तक्रारी आहेत. गटसचिवांच्या भरतीचे अधिकार नसताना बेकायदेशीर भरती केली आहे. प्रशासक नेमलेल्या संस्थांचे दप्तर सचिवांनी प्रशासकांना दिले नाही. सेवानिवृत्त होऊनही मर्जीतील सचिवांना मुदतवाढ दिली आहे.-काशिनाथ कदमतक्रारकर्ता, भाजपा तालुकाध्यक्ष