शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेपाठोपाठ दूध संघही तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:10 IST

आधी दूध आईचे मग दूध पंढरीचे अशा घोषवाक्यांमुळे घराघरात पोहोचलेला सोलापूर जिल्हा सहकारी संघ (दूध पंढरी) मागील आर्थिक वर्षात प्रथमच तोट्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक संकटातबँकेला १६-१७ या आर्थिक वर्षात  तब्बल ६१ कोटी ५५ लाख रुपये एवढा तोटा अधिक दर दिल्याने फटका

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९:  आधी दूध आईचे मग दूध पंढरीचे अशा घोषवाक्यांमुळे घराघरात पोहोचलेला सोलापूर जिल्हा सहकारी संघ (दूध पंढरी) मागील आर्थिक वर्षात प्रथमच तोट्यात आला आहे. शेतकºयाची बँक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक संकटात असताना जिल्हा लेबर फेडरेशन मात्र चार वर्षांनंतर नफ्यात आले आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस नेत्यांची सत्तास्थाने म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, लेबर फेडरेशन व जिल्हा परिषद ओळखली जातात. बहुतकरुन या संस्थांवर प्रतिनिधित्व करणाºयानाच  पुढे विधानसभा, विधान परिषद व लोकसभेवरही नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आज यापैकीच जिल्हा बँक व जिल्हा दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे असलेल्या कर्जाची वसुलीच होत नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली आहे. बँकेला १६-१७ या आर्थिक वर्षात  तब्बल ६१ कोटी ५५ लाख रुपये एवढा तोटा झाला आहे. शेतकºयांकडील व नेतेमंडळीकडील कर्जाच्या थकबाकीसाठी एन.पी.ए.साठी रक्कम टाकली आहे.नेतेमंडळींनीच थकविलेल्या कर्जामुळे आज जिल्हा बँक अडचणीत असली तरी वसुली झाली तर उद्या बँक पुन्हा सुुस्थितीत येऊ शकते; मात्र सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ अडचणीतून बाहेर येण्याची शक्यता दिसत नाही. कारण दूध पंढरीला ७ कोटी १२ लाख ४९ हजार ५९९ रुपये इतका तोटा झाला आहे. संघाच्या १६-१७ च्या वार्षिक अहवालात  ही बाब नमूद केली आहे. एकीकडे जिल्हा बँक व जिल्हा दूध संघ तोट्यात असताना जिल्हा लेबर फेडरेशन तोट्यातून नफ्यात आले आहे. २०१२-१३ पासून सलग चार वर्षे तोट्यात असलेल्या लेबर फेडरेशनला यावर्षी तीन लाख ९ हजार २०९ रुपये इतका नफा झाला आहे. मागील चार वर्षे फेडरेशनला तब्बल ४४ लाखांचा तोटा झाला होता.-----------------------------अधिक दर दिल्याने फटकासंघाच्या मागील आर्थिक वर्षाच्या अहवालात स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाºयांना एक कोटी ६९ लाख रुपये तसेच घसारा तरतूद दोन कोटी ४३ लाख रुपये अशी चार कोटी १२ लाख रुपये तर दुधाला अधिक दर दिल्याने असा एकूण ७ कोटी १२ लाख ४९ हजार ५९९ रुपये इतका तोटा झाल्याचे म्हटले आहे. शेतकºयांना शासन दरापेक्षा अधिक दर दिल्याने तोटा वाढल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले. च्जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांची संख्या २२० होती ती सध्या २१६ इतकी असून या आर्थिक वर्षांत ही संख्या आणखीन कमी होणार आहे.