शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर  : शासनाने दिलेले लाभ तोंडाला पाने पुसल्यासारखे, जुन्या पेन्शच्या मागणीवर कर्माचारी ठामचं

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 4, 2023 14:32 IST

जुनी पेन्शन संघटनेची बैठक, संघर्ष सुरु ठेवण्याचे आवाहन

सोलापूर  : महाराष्ट्र सरकारने २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व सेवा उपदानाचा निर्णय जाहीर केला आहे. शासनाने घेतलेला निर्णय हा तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. त्यामुळे जुनी पेन्शनच्या मागणीवर कर्मचारी ठामच असणार आहे, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली.

सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेची सोमवार ३ एप्रिल रोजी बैठक झाली. या बैठकीत जुनी पेन्शनच्या मागणीसाठीच्या पुढील दिशा ठरविण्याविषयी चर्चा झाली. मागील ८ वर्षांच्या अथक संघर्षाचे एकमेव आणि अंतिम ध्येय हे केवळ जुनी पेन्शन हेच आहे. कोणताही मधला मार्ग किंवा तडजोड आपल्याला यापूर्वीही कधी मान्य नव्हती आणि यापुढेही असणार नसल्याचा सुर बैठकीत निघाला.

यावेळी प्रशांत लंबे, किरण काळे, आशिष चव्हाण, साईनाथ देवकर, सतिश चिंदे, शिवानंद बारबोले, सचिन क्षिरसागर, ज्ञानेश्वर चव्हाण, अर्जुन पिसे, कृष्णदेव पवार, धनंजय धबधबे, दिपाली स्वामी, विजय राऊत, बाबासाहेब घोडके, संजय ननवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.शासनाची दुटप्पी भूमिकाजुनी पेन्शन प्रश्नावर सकारात्मक आहे, म्हणत असताना एनपीएसमध्ये सुधारणा करण्यासाठीच समिती नेमायची ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार एकमताने जुनी पेन्शन योजना नाकारण्याच्या तयारीत आहे, असे मत किरण काळे यांनी मांडले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन