शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील एसीबीच्या कारवाईत सा. बां. विभागाचे दोन लिपिक अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:11 IST

पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाºया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाºया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सातरस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणातील तक्रारदार यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागामधून निवृत्त होऊन मयत झाले आहेत. त्यांची पेन्शन तक्रारदाराच्या आईस मंजूर होती. या पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराच्या आईने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. यासंदर्भात चौकशीसाठी तक्रारदार गेला असता त्याच्याकडे वरिष्ठ लिपिक राजेंद्र तिपण्णा जमादार  व कनिष्ठ लिपिक सुजाता गायकवाड यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.लाचलुचपत विभागाने तक्रारीची दखल घेऊन खात्री केली असता त्यात तथ्य असल्याचे आढळले. त्यावरुन आज (बुधवारी) सायंकाळी ५.३० वाजता सात रस्ता येथील सा. बां. विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. त्यात तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक गायकवाड यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात वरिष्ठ लिपिक जमादार यासही ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप दिवाण, दिलीप बोरस्ते अप्पर पोलीस उपायुक्त पुणे, सहा. पोलीस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.