वैराग : दुस-या लाटेचा प्रादुर्भाव वैरागशहरासह परिसरात दिसत लागला आहे. नागरीकांनी काळजी न घेतल्यास वैराग शहर संपूर्ण लॉकडाऊन करावे लागेल. याची कल्पना वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड व महसूल अधिकारी सतीश पाटील यांनी दिली. तर नागरिक व व्यापाऱ्यांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल असे पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाकडुन पोलीस निरीक्षक विनय बहिर व सचिन शिंदे यांनी सांगितले.
वैराग येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कसा टाळायचा याबाबत रविवारी पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य यांच्यात बैठक पार पडली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनय बहिर, वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे, गावकामगार तलाठी सतीश पाटील या प्रमुखांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळू व न पाळणारा वर योग्य त्या दंडाची आकारणी करावी मात्र लॉकडाऊन करू नये अशी मागणी केली.
रूग्णसंख्या आटोक्यात आणून साखळी तोडण्यासाठी महसूल ग्रामपंचायत पोलीस व रूग्णायाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रकडून दररोज तपासणी व लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.रूग्णसंख्या आटोक्यात आणून साखळी तोडण्यासाठी महसूल ग्रामपंचायत पोलीस व रूग्णायाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रकडून दररोज तपासणी व लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
बैठकीस डॉ. पवन गुंड, निरंजन भूमकर ,मकरंद निंबाळकर, अरुण सावंत, प्रशांत भालशंकर , डॉक्टर असोसिएशनचे आनंद गोवर्धन , कापड असोसिएशनचे सुहास बंड, किराणा असोसिएशनचे विकास गवळी व प्रणित गांधी, बाळासाहेब पवार ,आदि उपस्थित होते.
---
दहा रुग्ण झाले बरे
सध्या शहरामध्ये महिन्याभरात २७ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी दहा रुग्ण बरे तर चौदा होम आयसोलेशन व दोन रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच एक रुग्ण मयत झाला आहे. वैरागमध्ये सध्या छत्रपती शिवाजी नगर १ , घोंगडे प्लॉट ७, धायगुडे प्लॉट २ , इंदिरानगर २ तर खरटमोल प्लॉट २ अशा १४ कँटोन्मेंटची निर्मिती करण्यात आली आहे.रूग्णसंख्या आटोक्यात आणुन साखळी तोडण्यासाठी महसुल ग्रामपंचायत पोलीस व रूग्णालयाकडुन वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रकडून दररोज तपासणी व लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.सध्या शहरामध्ये महिन्याभरात २७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी दहा रुग्ण बरे तर चौदा होम आयसोलेशन व दोन रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच एक रुग्ण मयत झाला आहे. वैरागमध्ये सध्या छत्रपती शिवाजी नगर १ , घोंगडे प्लॉट ७, धायगुडे प्लॉट २ , इंदिरानगर २ तर खरटमोल प्लॉट २ अशा १४ कँटोन्मेंटची निर्मिती करण्यात आली आहे.
----
०४ वैराग
वैराग ग्रामपंचायतीमध्ये सर्व प्रशासकीय व व्यापारी वर्ग बैठकीत मार्गदर्शन करताना आरोग्य अधिकारी