शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर बार्शीत कंटेन्मेंट झोनची निर्मिती करावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST

मंगल कार्यालयाच्या मालकांनी कार्यालयात होणाऱ्या विवाहाची माहिती एक दिवस अगोदर नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे़ पहिल्या वेळेस जर पन्नासपेक्षा ...

मंगल कार्यालयाच्या मालकांनी कार्यालयात होणाऱ्या विवाहाची माहिती एक दिवस अगोदर नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे़ पहिल्या वेळेस जर पन्नासपेक्षा जास्त लोक दिसून आले तर एक हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा असे दिसले तर दहा हजार रुपये दंड, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आणि एक महिन्यासाठी मंगल कार्यालय सील, अशी कारवाई केली जाणार आहे़

शहरात कपडे आणि किराणा बाजार मोठा आहे़ पालिका प्रशासनाने या दुकानदारांची नियमितपणे तपासणी करावी. त्यामध्ये व्यापारी अथवा ग्राहक जर विनामास्क दिसून आला़; दुकानात सामाजिक अंतर पाळले जात नसेल तर सुरुवातीला एक हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा दोन हजार दंड, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आणि एक महिन्यासाठी दुकान सील आणि शॉप अ‍ॅक्ट लायोन्स निलंबित अशी कारवाई केली जाणार आहे़ ग्रामीण भागातदेखील हा नियम लागू असणार आहे़

ॲन्टिजेन टेस्टनंतरच भगवंताचे दर्शन

भगवंत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करूनच दर्शनासाठी सोडले जाणार आहे़ त्यासाठी प्रवेशद्वाराजवळ तपासणीसाठी स्टॉल लावला जाणार आहे़

कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू

बंद केलेली आयटीआय व पॉलिटेक्निकमधील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केली आहेत़ यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्निकमध्ये ७५, तर खासगी हॉस्पिटल्स व होम आयसोलेशनमध्ये ७५ असे १५० रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत़ पूर्वीप्रमाणेच जगदाळे मामा हॉस्पिटल, डॉ़ संजय अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, चौधरी व सोमाणी हॉस्पिटल या ठिकाणी कोविड हॉस्पिटल कार्यान्वित आहेत़

-----

...तर कंटेन्मेंट झोनची निर्मिती

सध्या जिल्ह्यात सर्वाधिक बार्शी शहर व तालुक्यात ९०० रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्या जात आहेत़ ही संख्या वाढवून दोन हजार करण्यासाठी नियोजन सुरू आहे़ नागरिक व व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केले नाही तर नाइलाज म्हणून कंटेन्मेंट झोनची निर्मिती करून कडक अंमलबजावणी करण्याचा इशारा प्रांताधिकारी निकम यांनी दिला आहे़