शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

साडेआठ किलो चांदीचे दागिने जप्त

By admin | Updated: July 5, 2016 20:49 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील दोन घरफोड्यांना अटक करुन त्यांच्याकडून साडेआठ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले.

शहर गुन्हे शाखेची कारवाई : दोन घरफोड्यांना अटकसोलापूर : गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील दोन घरफोड्यांना अटक करुन त्यांच्याकडून साडेआठ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेने व्यक्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.हरजितसिंग शिशुपालसिंग टाक (वय २८, रा. तळेहिप्परगा गणपती मंदिर पाठीमागे, ता. उत्तर सोलापूर) व मलखानसिंग मायासिंग दुधानी (वय २७, रा. गुरुनानक नगर, रेल्वे स्टेशन, विजापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे यापूर्वी शिंदे चौकातील एका सराफाचे दुकान फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या शोधात असताना जुना तुळजापूर नाका येथे ते दोघे घुटमळत असल्याची खबर लागली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व बाळासाहेब शिंदे यांनी सापळा रचून मंगळवारी त्या दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे तपास केला असता, गुन्ह्याची कबुली दिली. या तपासात दोघांव्यतिरिक्त अन्य दोघांचा समावेश असून चौघांनी मिळून शांती चौकातील मुस्लीम कब्रस्तानसमोरुन एक कार पळवल्याची कबुलीही दिली आहे. शिंदे चौकातील सराफाचे दुकान फोडून ८.५ किलो दागिने चोरल्याचे सांगितले. याबरोबरच त्यांच्याकडून एक दुचाकी असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.ही कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहा. पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दत्तात्रय कोळेकर, बाळासाहेब शिंदे, पोहेकॉ. दगडू राठोड, अनिल वळसंगे, संजय बायस, जयंत चवरे, पोलीस नाईक राकेश पाटील, मुन्ना शेख, सुभाष पवार, मंजुनाथ मुत्तनवार, जयसिंग भोई, वसंत माने, धनंजय बाबर, गणेश शिर्के, शिवानंद भीमदे, लक्ष्मीकांत फुटाणे व निंबाळकर यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)