शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

१११ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

By admin | Updated: January 12, 2015 13:24 IST

वाकाव (ता. माढा) येथील जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर सोनारी येथे आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १११ जोडपी विवाहबद्ध झाली.

मोडनिंब : वाकाव (ता. माढा) येथील जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर सोनारी येथे आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १११ जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी सिनेसृष्टीतील महेश मांजरेकर, अलका कुबल, पूजा पवार, निशिगंधा वाड या कलाकारांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विवाह सोहळ्यासाठी आ. ओमराजे निंबाळकर, सोलापूर जि. प. चे माजी अध्यक्ष रामचंद्र माने, उस्मानाबाद जि.प. चे अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती दत्तात्रय मोहिते, भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. तानाजी सावंत, व्हा. चेअरमन शिवाजी सावंत, सूर्यवंशी, दयानंद मारकड, सुभाष गोरे, भजनदास खटके, यासीन बहामद, शशी पाटील, बाळासाहेब गाडे-पाटील, बाळासाहेब जगताप, जयंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, भाजपाचे अरविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते. अलका कुबल म्हणाल्या, सावंत कुटुंबीयांनी गेल्या १५ वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून हजारोंचे संसार उभे करून पुण्याईचे काम केले. अशी उदार अंत:करणाची माणसे कमीच पाहायला मिळतात, असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी वधू-वरांना प्रतिष्ठानतर्फे सांसारिक वस्तू देण्यात आल्या.विवाह सोहळ्यासाठी पं. स. सदस्य पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, रवी सावंत, अनिल सावंत, केशव सावंत, किरण सावंत, गिरीराज सावंत, संजय सावंत, रामभाऊ मस्के, गोवर्धन चवरे यांच्यासह जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी लाखापेक्षा जास्त वर्‍हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद केला. (वार्ताहर)