शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सिध्देश्वरची चिमणी पाडकामाच्या कामाची पाहणी, शेतकरी, कर्मचाºयांकडून विरोध अडथळा, उद्या निघणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 14:26 IST

सोलापूर दि १० : विमानतळास अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणीचे पाडकाम कसे करायचे यासाठी आलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेचे अधिकाºयांसमवेत प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाहणी उरकली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : विमानतळास अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणीचे पाडकाम कसे करायचे यासाठी आलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेचे अधिकाºयांसमवेत प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाहणी उरकली़ दरम्यान, या पथकास कारखान्याचे शेतकरी सभासद व कर्मचाºयांनी तीव्र विरोध केला़ मनपाचे पथक चिमणी पाडण्यासाठीच येत आहे म्हणून कारखान्याच्या शेतकरी सभासद व कर्मचारी प्रवेशव्दारावर मोठया संख्येने जमा झाले़ चिमणी पाडकामासाठी कोणालाही जवळ येऊ दिले जाणार नाही अशी भूमिका घेत हे आंदोलक वादग्रस्त चिमणीच्या बांधकामावर जाऊन बसले़ दरम्यान, सोलापूर विमानतळासाठी अडथळा ठरणारी चिमणी कशी पाडायची याची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या विहान कंपनीचे ठेकेदार कापसे यांनी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, उपअभियंता लक्ष्मण कारंजे यांच्यासह दुपारी बाराच्या सुमारास कारखानास्थळाला भेट दिली़ कारखाना स्थळावर आंदोलकांची गर्दी आहे हे समजताच पोलीस बंदोबस्त घेण्यात आला़ प्रथमत: पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांना एका बाजुला घेतले़ याच दरम्यान हे पथक आत आले़ त्यांनी चिमणीची पाहणी केली़ आंदोलकांनी निर्दर्शने केली़ पथकांना काय हवे आहे हे आंदोलकांना माहिती नव्हते़ पाहणी करून चिमणीचे पाडकाम कशा पध्दतीने करायचे याबाबत चर्चा केली़ तत्पुर्वी ही माहिती समजावून सांगण्यासाठी आंदोलकांना विश्वासात घ्यावे म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बैठक झाली़ पण कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, संचालक अमर पाटील, शिवशरण पाटील, गुरूसिध्द म्हेत्रे आदी कारखाना स्थळावर ठाण मांडून होते़   दरम्यान, कारखाना प्रवेशव्दारावर आयोजित बैठकीत चेअरमन धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडकामास विरोध करण्यासाठी उद्या शुक्रवार दि ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे घोषित केले़ हा मोर्चा सात रस्ता परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे़