शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

श्रीशैलमच्या रथोत्सवात सोलापूरचा नंदीध्वज अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:22 IST

महाराष्ट्रातील शेकडो कावडी अन् पालख्यांचाही श्रीशैलमच्या रथोत्सवात सहभाग, गुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात.

ठळक मुद्देदीडशे सोलापूरकर युवक सहभागी : पाताळगंगेतील स्नानानंतर सुरू झाला अनुपम्य सोहळाश्रीशैलम रथोत्सवात सहभागी होण्याची सोलापूरकरांची परंपरा ही आजचीच नाही तर त्याला सिद्धरामेश्वरांपासूनची आख्यायिका लाभलेली आहेगुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : कर्नाटक अन् सोलापूरचे भक्तगण़..वाद्यांचा दणदणाट.. उगादी(पाडवा)निमित्त निघालेल्या रथोत्सवात लाखोंची गर्दी़..महाराष्ट्रातील शेकडो कावडी अन् पालख्यांचाही सहभाग़..श्रीशैल मल्लिकार्जुनचा जयजयकार करीत सोलापूरचा २८ फुटी नंदीध्वज अग्रभागी ठेवून सात किलोमीटर फिरविण्यात आला़ नंदीध्वजाची ही झळाळी, पूजेचा मिळणारा मान यातून जीवन सार्थकी लागल्याच्या भावना व्यक्त होताहेत.

हा नेत्रदीपक सोहळा श्रीशैलम येथे गुढीपाडव्याच्या दिवशी पार पडला़ या सोहळ्यात सोलापूरमधील युवकांसह जवळपास १५० जणांनी सहभाग नोंदविला़ आंध्रमधील रेड्डी समाजाच्या दृष्टीने उगादी हा सण जणू दिवाळीच़ या सणात प्रथम पूजेचा मान हा सोलापूरकरांना मिळाला आहे़ सोलापूरमधील भक्तगण श्रीशैल गाठत असताना वाटेत अनेक गावांमधून भक्तगण कावड व पालखी घेऊन सहभागी होतात़ आंध्रमध्ये प्रवेश करताच ८० किमी अंतरात ७ डोंगर लागतात़ भीमनकोळा डोंगरावर भक्तगण हे मुंगीएवढे निदर्शनास येतात़ जंगलातून प्रवास होताना क रनूर - आलमपूरदरम्यान जंगलात  भक्तांना मुक्काम ठोकावा लागतो़ या भागात वनविभाग, काही सामाजिक कार्यकर्ते भक्तगण दाखल होण्यापूर्वीच वन्यजीव प्राण्यांचा वावर होऊ नये याची खबरदारी घेतात़ भक्तगण सोबत दोन ट्रक धान्य व साहित्य आणलेले असते़ सामूहिक स्वयंपाक करुन भूक भागवली जाते़ 

अमावस्येच्या दिवशी रात्री १२ वाजता श्रीशैल मल्लिकार्जुनला रुद्राभिषेक, विधीपूजा पार पाडली जाते़ दिवसभरात मल्लिकार्जुन यांच्या लिंगास सोन्याच्या नागफणाने सजवितात़ सिद्धेश्वर यात्रेतील करमुटगीच्या पार्श्वभूमीवर पाताळगंगेत गंगास्नान घातले जाते़ अन् सायंकाळी रथोत्सव सुरु होतो़ हा रथोत्सव डोळ्याचे पारणे फे डतो़ या उत्सवात सर्वात अग्रभागी सोलापूरचा नंदीध्वज असतो़ त्यामागे कावडी, पालखी आणि त्यामागे मल्लिकार्जुन आणि भ्रमरांबिका मातेची मूर्ती असते़ या ठिकाणी दोन दिवस नंदीध्वजाचा विसावा असतो़ 

रथोत्सवाच्या ओढीने चालतात ६०० कि़मी़ अंतर - श्रीशैलम रथोत्सवात सहभागी होण्याची सोलापूरकरांची परंपरा ही आजचीच नाही तर त्याला सिद्धरामेश्वरांपासूनची आख्यायिका लाभलेली आहे़ महाशिवरात्रीनंतर सोलापूरमधून जवळपास शंभर भक्तगणांचा एक गट येथून निघतो़ गुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात़ हे सारे श्रीशैलमध्ये जमतात़ दरम्यान, गुढीपाडव्याला दहा दिवसांचा अवधी असताना सोलापूरमधून युवकांचा एक गट वाहनाने निघतो़ सोबत नंदीध्वज घेऊन निघतात आणि आडकेश्वर येथे सारे एकत्रित येतात़ 

मंदिराच्या पुजाºयांनी पेलला नंदीध्वज - आध्यात्मिक वातावरणात निघालेला रथोत्सव हा मंदिर परिसरापासून सात किलोमीटर चालतो. या रथोत्सवात सोलापूरचाही नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिर परिसरातून जवळपास ७ किलोमीटर चालवला जातो़ बाराबंदीतील येथील युवक तेथे लक्ष वेधून घेतात़ सिद्धेश्वर सेवा संघाचे सागर बिराजदार, शैलेश वाडकर, श्रीशैल कोळी, शंकर बंडगर,भीमाशंकर झुरळे, स्वप्निल हुंडेकरी, गणेश कोरे, सोमा औजे, काशिनाथ हावळगी, कल्याणी बिराजदार आणि आनंद मंठाळे या युवकांनी नंदीध्वज पेलवून नेला़ याबरोबरच श्रीशैल देवस्थानचे पुजारी मधुशंकर यांनी २८ फु टी नंदीध्वज पेलून नेला़ तो पेलण्याचा आनंद त्यांच्या चेहºयावरुन ओसंडून वाहत होता़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा