शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

धक्कादायक; वेबसिरीजच्या आहारी गेल्याने मुलं वळताहेत गुन्हेगारी अन् अश्लीलतेकडं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 10:57 IST

सलग पाहण्याचा मोह पडतो महागात : सवयीत होतोय बदल

सोलापूर : स्मार्ट टीव्ही आणि मोबाईलमध्ये अनेक प्रकाराचा कंटेट उपलब्ध होत आहे. यामुळे मुले टीव्हीकडून वेबसिरीजकडे जात आहेत. वेबसिरीजचे सर्वच भाग एकाच रात्री बघण्याचा मोह मुलांना होत आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल घडत आहेत. त्यामुळे पालकांनी आपली मुले वेबसिरीजच्या आहारी तर गेले नाहीत ना हे तपासून पाहण्याची गरज मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली.

टीनेजर्स मुलांचे वय हे घडण्याचे जितके असते तसेच ते बिघडण्याचेही असते. याच वयात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडून एक प्रकृती तयारी होते. या काळात जर वेबसिरीजच्या माध्यमातून क्राईम (गुन्हेगारी) आणि सेक्शुअल (अश्लील) कंटेट पाहण्यात आला तर त्याचे वाईट परिणाम मुलांच्या मनावर घडतात. लहानशा खेड्यापासून ते मोठ्या शहरात अशा त्रासांना मुलांना सामोरे जावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका मुलाने वडिलांचाच खून केला. त्याला मित्र नव्हते, एकलकोंडा झाल्याने तो वेबसिरीजच्या जाळ्यात ओढला गेला. पालकांनी वेळ न दिल्यामुळे त्यांच्याविषयीचा राग मनात होता. त्यामुळे खून करेपर्यंत त्याची मजल गेली. हे सगळे एका दिवसात झाले नव्हते. हळूहळू ही प्रक्रिया घडत असते.

-------

ही पहा उदाहरणे

  • - शाळा बंद असल्यामुळे एक मुलगा सकाळी नव्हे तर दुपारी उठत होता. रात्रभर वेबसिरीज पाहिल्याने त्याच्या सवयीत बदल झाला. कोणतेही काम करताना तो हळूहळू करत होता. त्यामुळे त्याच्या पालकाने मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली.
  • - वेबसिरीज सतत पाहिल्यामुळे त्यातील कंटेटचा मुलांच्या मनावर परिणाम झाला. मुलांमध्ये अभ्यास न करणे, चिडचिडेपणात वाढ होत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत.
  • - किशोरवयीन मुलांमध्ये समजूतदारपणा कमी असतो. आपल्याला सगळेच कळते, आता मी मोठा झालो आहे अशा भावना त्यांच्यात तयार होतात. त्यात पालकांचे मैत्रीपूर्ण संबंध नसल्यामुळे घरातून जाण्याच्या घटना घडत आहेत.

-------

मुले मोबाईलवर काय पाहत आहेत ?

आपली मुले मोबाईलवर काय पाहत आहेत याकडे पालकांचे लक्ष असायला हवे. याचा अर्थ मुलांना मोबाईल देऊच नये असा होत नाही. ते काय पाहतात याविषयी मुलांना बोलते करावे. मित्राप्रमाणे मुलांना समजावून सांगितले तर ते ऐकतात. जर कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही व मनमोकळे राहात असेल, आपली मुलंही मोबाईलपासून दूर राहतात. पालकांनी मुलांबरोबर असताना मोबाईल थोडा बाजूला ठेवायला हवा.

----

  • पालकांनी फक्त पालक न राहता मित्र व पालक अशा दोन्ही भूमिकेतून मुलांकडे पाहावे. त्यांना अधिक वेळ द्यावा. मुले आणि पालक हे सुसंवाद (शेअरिंग) करत असल्यास त्यांच्यात मित्रत्वाचे नाते तयार होते. त्यामुळे मुले नेमके काय करतात हे पाहणे सोपे होऊन वेळीच मुलांना वेबसिरीजच्या धोक्यापासून दूर ठेवता येते. यासोबतच मुलांना मैदानी खेळ, घरातील खेळ किंवा एखाद्या छंदात सहभाग घ्यायला लावावा.
  • - डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचार तज्ज्ञ

 

टॅग्स :SolapurसोलापूरSocial Mediaसोशल मीडियाWebseriesवेबसीरिज