शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात फेब्रुवारीमध्ये रंगणार ‘शिवोत्सव’

By admin | Updated: January 10, 2017 00:32 IST

आंतरविद्यापीठ युवा महोत्सव : देशभरातील सुमारे दीड हजार विद्यार्थी कलाकारांचा सहभाग

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात तरुणाईच्या विविध कलागुणांचे दर्शन घडविणारा ‘शिवोत्सव-२०१७’ हा युवा महोत्सव दि. १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. असोसिएशन आॅफ इंडियन युनिर्व्हसिटीज् (एआययु) आणि केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयाच्या सहकार्याने आठ वर्षांनंतर विद्यापीठामध्ये हा महोत्सव होणार आहे. त्यात देशभरातील १२५ विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकार सहभागी होणार आहे.विविध कलाप्रकारांद्वारे भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एआययू आणि केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव घेण्यात येतो. गेल्यावर्षी म्हैसूरमध्ये महोत्सव झाला होता. यंदाचा ३२वा महोत्सव शिवाजी विद्यापीठात होणार आहे. त्यात संगीत, गायन, फाईन आर्टस्, नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, लघुनाटिका, मूकनाट्य, एकांकिका, अशा विविध २५ कलाप्रकारांमध्ये महोत्सवात स्पर्धा होतील. देशातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती विभागातील महोत्सवातील विविध कलाप्रकारांमधील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या विद्यापीठांचे संघ ‘शिवोत्सव’मध्ये सहभागी होतील. आतापर्यंत चार विभागांचे महोत्सव पूर्ण झाले असून, सध्या पाचव्या विभागाचा महोत्सव गुजरातमध्ये सुरू आहे. ‘शिवोत्सव’मध्ये देशातील विविध विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकार सहभागी होतील. त्यांच्या कला-गुणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे कोल्हापूरकरांना दर्शन घडणार आहे. या महोत्सवातील विजेत्यांची निवड दक्षिण आशियाई आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी होणार आहे. (प्रतिनिधी)विविध २६ समित्यांद्वारे महोत्सवाची तयारी सुरूशिवाजी विद्यापीठाने केलेल्या मागणीनुसार ‘एआययू’ने यावर्षीच्या महोत्सवाचे यजमानपद विद्यापीठाला दिले असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी सोमवारी दिली. ते म्हणाले, यंदाच्या युवा महोत्सवाला विद्यापीठाने ‘शिवोत्सव’ असे नाव दिले आहे. आठ वर्षांनंतर विद्यापीठाला या महोत्सवाचे संयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्याची तयारी गेल्या महिन्यापासून सुरू आहे. यासाठी निवास-जेवण, परीक्षक नियुक्ती, आदी स्वरुपातील विविध २६ समित्यांची नियुक्ती केली आहे. महोत्सवासाठी विद्यापीठात व्यासपीठांची उभारणी, आवश्यक साहित्यांची खरेदी, निमंत्रण पत्रिकांची छपाई, आदी स्वरुपातील तयारी सुरू आहे.