शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटल्या !

By admin | Updated: July 21, 2014 01:26 IST

उद्धव ठाकरे : अजित पवारांवरही घणाघात

बार्शी : शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटून त्यावर विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्याचे टीकास्त्र रविवारी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीकेची झोड उठविली. भगवंताच्या बार्शीतला भगवा राज्यात फडकवा, असे आवाहन त्यांनी केले.सत्तेत असताना शरद पवारांनी कधीही दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी आपले वजन वापरले नाही. पण मोदी सत्तेवर येताच राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पंतप्रधानांना सांगण्यासाठी भेटल्याचे सांगून आपले फोटो ते छापून आणत आहेत. सत्ता असताना महाराष्ट्राचे भले का केले नाही? असा सवाल करतानाच उद्धव यांनी दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांऐवजी पवारांना राज्यात २६ लवासासारखे प्रकल्प उभे करण्यात जास्त रस असल्याचा आरोप केला. गरिबांविषयी त्यांना कळवळा नाही. तर ‘हिल स्टेशन’ उभारण्यात त्यांना धन्यता वाटते, अशीही टीका त्यांनी केली.शिवसेना सोडून गेलेले तडफडत आहेत. त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. शिवसेनेमध्ये प्रेम आहे, असे सांगत सत्ताधाऱ्यांची पैशांची मस्ती वाढत आहे. त्यामुळे आपले सरकार येणारच आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला. -----------------स्वीट डिशची काळजीगेल्या १५ वर्षांपासून आघाडी सरकारने खाण्याचेच काम केले आहे. सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र त्याचा परिणाम किती झाला हे दिसत नाही. अजित पवारांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वीट डिशची चिंता जास्त आहे, असा टोला त्यांनी लगावला. नारायण राणे यांची सद्दी संपली असून त्यांना अस्तित्वासाठी सध्या लढावे लागत असल्याचे ते म्हणाले.