शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

करमाळ्यात शह-काटशहाचा डाव रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST

करमाळा : जगताप व बागल गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिव निवडीच्या बैठकीस बारामती अ‍ॅग्रोचे उपाध्यक्ष ...

करमाळा : जगताप व बागल गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिव निवडीच्या बैठकीस बारामती अ‍ॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. सावंत गटाने बागलांच्या पारड्यात माप टाकल्याने राजकारणाची समीकरणे बदलू लागली आहेत. यानिमित्ताने शह-काटशहाचा डाव रंगला आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाल्यापासून गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत बाजार समिती तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरू लागली आहे. माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक व बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी जगताप गटातून बंड केल्यापासून तालुक्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आहेत.

सोमवारी प्रभारी सचिव निवडीच्या बैठकीत बाजार समितीचे प्रभारी सचिव पाटणे की क्षीरसागर यावरून शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या निरीक्षणाखाली हात वर करून मतदान घेण्यात आले. बाजार समितीमध्ये काटावर बहुमत असल्याने सर्वांचे लक्ष लागलेल्या या घडामोडीत बागल गटाचे संचालक व बारामती अ‍ॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी नसती कटकट नको म्हणून ते बैठकीस आलेच नाहीत. याविषयी तालुकाभर उलटसुलट चर्चा रंगली आहे.

----

राजकारण ढवळले

सभापतीला असलेल्या जादा एक मताच्या विशेषाधिकाराने राजेंद्र पाटणे यांच्या नावाचा प्रभारी सचिव म्हणून ठराव झाला असला तरी बाजार समितीचे राजकारण मात्र ढवळून निघाले आहे. जगताप गटाबरोबर असलेले सावंत गटाचे वालचंद रोडगे हे हमालांचे प्रतिनिधी बागलांच्या कळपात गेले तर माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक दत्तात्रय रणसिंग यांनी जगतापांना साथ दिली आहे.

---

बाजार समितीमध्ये राजकारण नको, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या मताचा मी आहे. आपण पक्षाच्या कामानिमित्ताने मुंबईला गेलो होतो. त्यामुळे मला या बैठकीस येता आले नाही.

- संतोष वारे, संचालक व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

----

राजेंद्र पाटणे या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यावर बढतीमध्ये सातत्याने अन्याय झाला होता. त्यांना या निमित्ताने न्याय देण्यासाठी सावंत गटाने पाटणेंच्या बाजूने मतदान केले. राजकारणात आम्ही आ. संजयमामा शिंदे गटाबरोबरच सक्रिय आहोत.

- सुनील सावंत, नेते सावंत गट

----

हमालांच्या हितासाठी सभापती बंडगर यांच्या विनंतीनुसार पाटणे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. - अ‍ॅड. राहुल सावंत, अध्यक्ष, हमाल पंचायत.

----