शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या प्रवर्गाच्या जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गातील सरपंचाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST

गादेगावच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर २७ जानेवारी रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले होते. त्यामुळे या ...

गादेगावच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर २७ जानेवारी रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले होते. त्यामुळे या प्रवर्गातील एकमेव सदस्या ज्योती बाबर यांची सरपंचपदी निवड निश्चित मानली जात होती.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे न्यायालयीन प्रकरणानंतर फेर आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये गादेगावचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले होते. फेरआरक्षण सोडतीचे ज्योती बाबर यांनीही स्वागत केले होते. मात्र, त्यांची सरपंचपदाची संधी हुकल्याने सर्व ग्रामस्थांनी खुल्या जागेवरून ज्योती बाबर यांना सरपंच करण्याचे ठरविले आणि त्यानुसार २६ फेब्रुवारी रोजी सरपंच निवडीवेळी केवळ ज्योती बाबर यांचाच अर्ज दाखल झाला अन‌् त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपसरपंचपदासाठी योगेश बागल या युवकाची निवड झाली. सरपंच आणि उपसरपंच हे दोघेही पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य झाले असून, दोघेही पदवीधर आहेत. ग्रामस्थांच्या या निर्णयाबद्दल नूतन सरपंच ज्योती बाबर आणि उपसरपंच योगेश बागल यांनी आभार मानले. निवडीनंतर नूतन सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.