शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धावा केला, शिणवटा घालविला!

By admin | Updated: July 2, 2017 04:04 IST

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी

शहाजी फुरडे-पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्कतोंडले बोंडले (सोलापूर) : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी तोंडले-बोंडलेच्या उतारावर ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात धावा करून वारीतील चालण्याचा शीणवटा घालविला. रात्री सोहळा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे विसावला.संत तुकाराम महाराज सोहळा माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील मुक्काम आटोपून सकाळी ७ वाजता तोंडले-बोंडलेकडे मार्गस्थ झाला. माळखांबीमार्गे दुपारी बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराजांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता, अशी आख्यायिका आहे़ त्यामुळे दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांनी येथे धावा केला. सोहळा तोंडले-बोडले येथे दाखल झाला त्यावेळी माऊलीची पालखी तोंडले येथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबली होती़ तुकारामांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी माऊलीच्या रथाचे तर काही जणांनी गावात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले. याच दरम्यान संत सोपान काकांची पालखी ही माऊली व तुकोबांची वाट पाहत थांबली होती. तुकारामांचा सोहळा बोंडले येथे येताच संत सोपानकाका आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रथ एकमेकांजवळ आणण्यात आले़ दोघा संतांची भेट झाल्यानंतर पुंडलिक मोरे महाराज व नारायण गोसावी यांनी एकमेकांना मानाचे नारळ दिले. त्याबरोबरच संताजी महाराज जगनाडे यांनी ही तुकोबांची भेट घेतली. बोंडले येथून पुढे सोपानकाका त्यांच्या मागे तुकाराम महाराज पालखी सोहळा गेल्यानंतर तीन वाजता माऊलींची पालखी निघाली. या सोहळ्यातील वारकरी विठ्ठलाचे वास्तव्य असलेल्या पंढरपूर तालुक्यात जाणार असल्याने झपाझप पावले टाकत चालत होते. भक्तांचा महापूरबोंडले ते पिराची कुरोली फाटा दरम्यान दोन्ही पालखी सोहळे एकाच मार्गावरून चालत असल्याने सुमारे पाच ते सहा लाख वारकरी विठू नामाचा गजर करीत होते़ त्यामुळे हा टप्पा म्हणजे खऱ्या अर्थानं भक्तीचा महापूर आल्यासारखा दिसत होता.