शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सत्यम सत्यम म्हणताच लक्ष लक्ष हातानी टाकल्या अक्षता

By admin | Updated: January 13, 2017 19:37 IST

पांढ-या शुभ्र बाराबंदी पोषाखातील भक्त जणू दूधाच्या सागराप्रमाणे सिध्देश्वर तलावाभोवती जमला... मानाच्या सात काठ्या येताच श्री सिध्देश्वराचा जयघोष करत अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - पांढ-या शुभ्र बाराबंदी पोषाखातील भक्त जणू दूधाच्या सागराप्रमाणे सिध्देश्वर तलावाभोवती जमला... मानाच्या सात काठ्या येताच श्री सिध्देश्वराचा जयघोष करत अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली. सत्यम सत्यम म्हणताच लक्ष लक्ष हातानी अक्षता टाकल्या. 
दुपारी २ च्या सुमारास सारही नदीध्वज सन्मत्ती कट्ट्याजवळ आले. त्यानंतर कुंभार समाजाच्या मानक-यांनी यात्रेचे मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांना विवाह सोहळ्याचा विडा दिला. त्यानंतर सुहास शेटे यांनी समंती वाचन केले. त्यानंतर सुगडी पूजन अर्थात गाडग्यांचे पूजन करण्यात आले.  मंगलाष्टिका झाल्यावर लाखो भाविकानी अक्षता टाकल्या आणि विवाह पार पडला. 
 
काय आहे अख्यायिका?
- सिध्देश्वर महाराजांचे वास्तव्य सोलापूरात असताना त्यांच्या सेवेत असलेली एक कुंभार कन्या त्यांची निस्सिम भक्त बनली आणि तिने सिध्देश्वर महाराजांशी विवाह करण्याचा हट्ट धरला. मात्र सिध्देश्वर महारांनी तिला नकार दिला. मात्र, कुंभार कन्या हट्ट सोडत नव्हती. त्यामुळे महाराजानी त्यांच्या युगदंडाशी  विवाह करण्याची परवानगी दिली आणि या कन्येचा सिध्दरामेश्वरांच्या युगदंडाशी विवाह झाला. त्या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी हा प्रतिकात्मक सोहळा पाच दिवस चालतो. तीच सिध्देश्वरची यात्रा म्हणून ओळखली जाते. योगदंडाचे प्रतिक म्हणून आता नंदीध्वजाशी विवाह लावण्यात येतो.