शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संजय शिंदे बिनविरोध, उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील

By admin | Updated: March 21, 2017 15:23 IST

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संजय शिंदे बिनविरोध, उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संजय शिंदे बिनविरोध, उपाध्यक्षपदी शिवानंद पाटीलसोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप पुरस्कृत महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी रणजितकुमार यांनी जाहीर केली़ दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेत मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती़ निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ प्रारंभी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रवादीकडून शेकापच्या अनिल मोटे तर उपाध्यक्षपदासाठी श्रीमंत थोरात तर भाजप पुरस्कृत महाआघाडीकडून अध्यक्षपदासाठी संजय शिंदे तर उपाध्यक्षपदासाठी शिवानंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता़ मतदानासाठी दुपारी २ ची वेळ दिली होती़ त्यासाठी दुपारी २ वाजता भाजपा पुरस्कृत महाआघाडीच्या सर्वच उमेदवारांनी हेरिटेज हॉटेलमधून गाड्यांच्या ताफ्यासह जिल्हा परिषदेत दाखल झाले होते़ राजकीय मोर्चेबांधणीत यशस्वी झालेल्या महाआघाडीच्या उमेदवारांना ६९ सदस्यांपैकी ४७ सदस्यांचे मतदान होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़ त्यामुळेच की काय ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही जिल्हा परिषदेची निवडणुक बिनविरोध झाली़ राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या़ त्या पाठोपाठ काँग्रेस तसेच काही स्थानिक आघाड्याही राष्ट्रवादीच्या बाजुनं होत्या़ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व उपाध्यक्ष सहज होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ मात्र माढ्याचे अपक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी बरोबर न जाता स्वत:च मोर्चबांधणी सुरू केली़ त्यानुसार भाजप व काही स्थानिक आघाड्यांना सोबत घेण्यात संजय शिंदे यशस्वी ठरले़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आ़ प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, उत्तम जानकर, धनराज शिंदे, आ़ बबनदादा शिंदे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, रणजितसिंह शिंदे, शहाजीबापू पाटील यांच्यासह महाआघाडीचे अन्य नेते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते़