शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

संजय देशमुखसह सहा जणांचा जामीन फेटाळला

By admin | Updated: May 7, 2014 22:51 IST

सोलापूर :मोटरसायकलीस धडक मारल्यावरून अशोक भडकवाड यांना मारहाण करून एक हजाराची लूट

सोलापूर :मोटरसायकलीस धडक मारल्यावरून अशोक भडकवाड यांना मारहाण करून एक हजाराची लूट व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणात मोहोळ तालुका शिवसेनाप्रमुख संजय देशमुख यांच्यासह सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी फेटाळून लावला. अशोक भडकवाड हे ४ ऑगस्ट २००१ रोजी भावाबरोबर मोहोळ बसस्थानकाकडे जात असताना महेश देशमुख, रणजित गायकवाड यांच्या मोटरसायकलीची धडक लागली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून दुसर्‍या दिवशी अशोक हे कामावरून गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांना अनगर फाट्याजवळ अडवून शिवीगाळ केली. संजय याने कानफटावलं तर रणजित याने गच्ची पकडली. शिवाजी व महेश देशमुख यांनी लाथाबुक्क्याने, हॉकी स्टिकने, विक्रांत देशमुख याने साखळीने मारहाण केली. संजय याने खिशातील एक हजाराची रोकड पळविली. याबाबत मोहोळ पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यानंतर आरोपी जमावासह पोलीस ठाण्यात आले व तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याला घाबरून त्यांनी तक्रार नसल्याचा जबाब दिला. त्यानंतर गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलाविले पण फौजदार धुमाळ हजर राहिलेच नाहीत. अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने भडकवाड यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने संजय देशमुख, रणजित गायकवाड, महेश देशमुख, विक्रांत देशमुख, अजय देशमुख, साईनाथ गायकवाड व फौजदार धुमाळ यांच्याविरूद्ध मारहाण करून लूट व ॲट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करून मोहोळ पोलिसांना अहवाल देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. महेश जगताप तर आरोपींतर्फे ॲड. राज पाटील यांनी काम पाहिले.