शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्यात गारांचा पाऊस, वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST

खरीप हंगाम पूर्व हा वळवाचा पाऊस शेतीला पोषक मानला जात आहे. मात्र, तालुक्यातील दक्षिण पश्चिम व उत्तरेकडील काही भागांत ...

खरीप हंगाम पूर्व हा वळवाचा पाऊस शेतीला पोषक मानला जात आहे. मात्र, तालुक्यातील दक्षिण पश्चिम व उत्तरेकडील काही भागांत जोरदार वादळी वारे वाहत होते. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.

सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरात बसून आहेत. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होेत. त्यात दुपारनंतर जोरदार वादळी वारे वाहत मेघगर्जनेसह पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी अचकदाणी, कटफळ या भागाला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसून घरावरील पत्रे उडून गेले. महावितरण कंपनीचे विजेच्या खांबावरील तारा तुटून नुकसान झाले होते, दरम्यान शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कामे उरकून खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे उरकून उसंती घेतली सुरू आहेत.

रविवारी सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन दुपारनंतर अचानक पावसास सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. वळवाच्या पावसात बाळगोपाळांनी भिजून आनंद घेतला तर उकाड्याने हैराण झालेल्या आबालवृद्धांना थंडगार हवेमुळे दिलासाही मिळाला. या पावसामुळे कडवळ, उन्हाळी भुईमूग, डाळिंबासह फळबागांना दिलासा मिळाला आहे.

वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली

रविवारी सांगोला शहर वाढेगाव, राजापूर, आलेगाव, मेडशिंगी, वाणीचिंचाळे, वाकी घेरडी, तरंगेवाडी, घेरडी, हंगिरगे, पारे, नराळे डिकसळ, शिरभावी, धायटी, चिंचोली या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून व वृक्ष उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले तसेच केशर, गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविला जात आहे.

फोटो

०९सांगोला-पाऊस

सांगोला शहरासह बिलेवाडी, सावंतवस्ती, बुरांडेवस्ती परिसरात झालेल्या पावसाचे छायाचित्र.