शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भटुंबरे येथे वाळू उपसा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसुार, पिकअप चालक किरण अनिल वाघमारे (रा. भटुंबरे, ता. पंढरपूर), रणजित श्यामराव इटकर (रा. जुना कऱ्हाड नाका, ...

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसुार, पिकअप चालक किरण अनिल वाघमारे (रा. भटुंबरे, ता. पंढरपूर), रणजित श्यामराव इटकर (रा. जुना कऱ्हाड नाका, पंढरपूर), बबलू प्रक्षाळे (रा. भटुंबरे, ता. पंढरपूर), विकास तानाजी जाधव (रा. पेनूर, ता. मोहोळ) यांनी संगनमत करून, भीमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले.

या प्रकरणी वरील तिघांविरुद्ध पोलीस कर्मचारी शिवशंकर सोमांना हुलजंती यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन लाख रुपये किमतीची नंबर नसलेली गाडी व तीन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.

-----

कासेगाव येथे जुगारावर कारवाई

कासेगावच्या शिवारात विठ्ठल देवस्थानचे जागेतील चिलाराच्या झुडपामध्ये भाग्यवंत किसन पवळ (वय ३७, रा. चिचोली, ता. सांगोला), तानाजी प्रकाश गवळी (रा. खर्डी, ता. पंढरपूर), समाधान दत्तात्रय होनमाने (वय २२, रा. तनाळी, ता. पंढरपूर), महादेव अनिल रणदिवे (२५, रा. अकोला, ता. मंगळवेढा), दिगंबर लक्ष्मण पवार (६०, रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) हे सर्वजण गोलाकार बसून तीरट नावाचा जुगार शनिवारी खेळत होते. या दरम्यान त्यांच्यासमोर रोख रक्कम ११ हजार ५०० रुपये मिळून आली. वरील सर्वांविरुद्ध हणमंत गोरख भराटे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुजित उबाळे करीत आहेत.

-----

तीन ठिकाणी दारू जप्त

कासेगाव (ता. पंढरपूर) येथे तीन ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी देशी दारू जप्त केली आहे. यामध्ये सुनील धोंडिबा काळे (वय ४५, रा. रूपनर वस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) याच्याकडे एका वायरच्या पिशवीमध्ये ६७६ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १३ बाटल्या शनिवारी मिळून आल्या, तसेच अतुल मधुकर रूपनर (४०, रा. रूपनर वस्ती, कासेगाव, पंढरपूर) याच्याकडे १ हजार ४० रुपये किमतीच्या २० देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. ‌ज्ञानेश्वर मधुकर माेरे (४०, रा. तानाजी चौक, पंढरपूर, सध्या बेंदवस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) याच्याकडे १ हजार ४० रुपये किमतीच्या २० देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या असल्याचे पोलीस निरीक्षक अवचर यांनी सांगितले.

---